शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी मालेगाव येथे विशेष प्रशासकीय शिबिराचे आयोजन

'छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर, महाराजस्व अभियान' अंतर्गत शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी अमेय लॉन्स, टेहरे फाटा, मालेगाव कॅम्प येथे विशेष प्रशासकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी मालेगाव येथे  विशेष प्रशासकीय शिबिराचे आयोजन मुख्य फोटो
मुख्य फोटो

मालेगाव : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त आयोजित 'छत्रपती शिवाजी महाराज समाधान शिबिर, महाराजस्व अभियान' अंतर्गत शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६ रोजी अमेय लॉन्स, टेहरे फाटा, मालेगाव कॅम्प येथे विशेष प्रशासकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या शिबिरामध्ये अमृत संस्थेचा माहिती व मार्गदर्शन स्टॉल उभारण्यात येणार असून, नागरिकांना अमृत संस्थेच्या विविध योजनांची सविस्तर माहिती, लाभार्थी नोंदणी, स्वयंरोजगार, कौशल्य विकास तसेच विविध प्रशिक्षण कार्यक्रमांबाबत मार्गदर्शन करण्यात येणार आहे. ड्रोन प्रशिक्षण, उद्योजकता विकास कार्यक्रम (EDP), ई-व्ही चार्जिंग स्टेशन, सॉलिड वेस्ट मॅनेजमेंट तसेच इतर विविध उपक्रमांची माहितीही नागरिकांना उपलब्ध करून दिली जाणार आहे. याशिवाय या विशेष शिबिरामध्ये विविध शासकीय विभागांचे माहिती स्टॉल्स उभारण्यात येणार असून, शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, दाखले, अर्ज प्रक्रिया तसेच प्रशासकीय सेवांबाबत नागरिकांना थेट मार्गदर्शन करण्यात येणार आहे. अमृत संस्थेचे लाभार्थी तसेच मालेगाव शहर व परिसरातील सर्व महिला, पुरुष, युवक, युवती आणि विद्यार्थ्यांनी या विशेष प्रशासकीय शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) ही महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या समाजघटकांना कोणत्याही शासकीय महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी विविध योजना राबविते. अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी आणि भूमिहार या २४ जातींचा समावेश आहे. या समाजघटकांतील वार्षिक उत्पन्न ₹८ लाखांपेक्षा कमी असलेले पात्र नागरिक अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी संपर्क : - दीपक हरिलाल गुप्ता – ९४२३४७६९२९ - अजिंक्य संजय कन्नल – ९६६५६९२६७६ स्थळ : अमेय लॉन्स, टेहरे फाटा, मालेगाव कॅम्प दिनांक : शनिवार, दि. १ ऑगस्ट २०२६


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Mangesh Khadilkar News publisher name | Date: 28-07-2026 News publication date | Time: 03:32 PM News publication time | Views: 337 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news
Publisher: Mangesh Khadilkar News publisher name | Date: 28-07-2026 News publication date | Time: 03:32 PM News publication time | Views: 337 Number of times this news has been viewed | District: Nashik Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 3 Comments

A
Ajinkya Kannal
02-08-2026 07:50 AM

अमृत–सक्षम हा AMRUT संस्थेचा घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रातील उद्योजकता विकास उपक्रम आहे. या उपक्रमातून युवक, महिला व इच्छुक उद्योजकांना कचऱ्यापासून मूल्यवर्धित उत्पादने तयार करण्याचे प्रशिक्षण, तांत्रिक मार्गदर्शन, शासकीय योजनांची माहिती, कर्ज, अनुदान व बाजारपेठ उपलब्ध करून स्वावलंबी आणि पर्यावरणपूरक उद्योग उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले जाते.

A
Amit kanhyalal sharma
01-08-2026 07:13 AM

Chan Yojana aahe

n
navin munot
31-07-2026 09:48 PM

Solid waste management badal mahiti pahije

Write a Comment
0 / 50 words
Advertisement