अकोला येथे कान्यकुब्ज ब्राह्मण समाज सेवाभावी ट्रस्टच्या विदर्भ प्रांताच्या बैठकीत दिली अमृतच्या विविध योजनांची माहिती

अकोल्यात झालेल्या कान्यकुब्ज ब्राह्मण समाज सेवाभावी ट्रस्टच्या विदर्भ प्रांताच्या पहिल्या बैठकीत समाज संघटनासह अमृत संस्थेच्या स्वयंरोजगार व कौशल्य विकास योजनांची माहिती देण्यात आली.

अकोला येथे कान्यकुब्ज ब्राह्मण समाज सेवाभावी ट्रस्टच्या विदर्भ प्रांताच्या  बैठकीत दिली अमृतच्या विविध योजनांची माहिती  मुख्य फोटो
अकोला येथे कान्यकुब्ज ब्राह्मण समाज सेवाभावी ट्रस्टच्या विदर्भ प्रांताच्या  बैठकीत दिली अमृतच्या विविध योजनांची माहिती  अतिरिक्त फोटो

संपूर्ण महाराष्ट्रातील कान्यकुब्ज ब्राह्मण समाजाला एकत्र आणण्याच्या उद्देशाने स्थापन करण्यात आलेल्या कान्यकुब्ज ब्राह्मण समाज सेवाभावी ट्रस्टच्या विदर्भ प्रांतातील पहिली बैठक रविवार, दि. २६ जुलै २०२६ रोजी अकोला येथील हॉटेल वीनस येथे उत्साहात संपन्न झाली. बैठकीत विदर्भासह राज्यातील विविध भागांतून आलेल्या प्रतिनिधींनी मोठ्या संख्येने सहभाग घेत समाज संघटन, युवा सहभाग, समाजहिताचे उपक्रम, आर्थिक विकास तसेच भविष्यातील कार्ययोजना यावर सविस्तर चर्चा केली. कार्यक्रमात विविध मान्यवरांनी समाज संघटनाचे महत्त्व, ट्रस्टची भावी दिशा, युवकांचा सहभाग, यज्ञोपवीत व विवाह संस्कार तसेच समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबाबत मार्गदर्शन केले. समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन संघटितपणे कार्य केल्यास समाजाचा सर्वांगीण विकास अधिक प्रभावीपणे साध्य होईल, असा विश्वासही वक्त्यांनी व्यक्त केला. यावेळी महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने अकोला जिल्हा व्यवस्थापक धनंजय कुळकर्णी तसेच जिल्हा उपव्यवस्थापक गणेश मुळे उपस्थित होते. धनंजय कुळकर्णी यांनी अमृत संस्थेमार्फत आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी राबविण्यात येणाऱ्या स्वयंरोजगार, कौशल्य विकास, उद्योजकता प्रशिक्षण, रोजगाराभिमुख उपक्रम तसेच विविध शासकीय योजनांची सविस्तर माहिती उपस्थितांना दिली. समाजातील युवक, महिला व गरजू घटकांनी या योजनांचा लाभ घेऊन स्वावलंबी बनावे, असे आवाहन त्यांनी केले. यावेळी उपस्थितांनी अमृत संस्थेच्या विविध योजनांविषयी उत्सुकता व्यक्त करत प्रशिक्षण व स्वयंरोजगाराच्या संधींचा लाभ घेण्याची तयारी दर्शविली. बैठकीचा समारोप समाजहितासाठी एकत्रितपणे कार्य करण्याच्या निर्धाराने करण्यात आला.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: Dhananjay Kulkarni News publisher name | Date: 28-07-2026 News publication date | Time: 01:37 PM News publication time | Views: 102 Number of times this news has been viewed | District: akola Related district of the news
Publisher: Dhananjay Kulkarni News publisher name | Date: 28-07-2026 News publication date | Time: 01:37 PM News publication time | Views: 102 Number of times this news has been viewed | District: akola Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement