महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था अमृत यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'अमृत संवाद सेतू' या उपक्रमांतर्गत यवतमाळ येथील बाबाजी दाते महाविद्यालयाला सदिच्छा भेट देण्यात आली.
यवतमाळ : महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था अमृत यांच्या वतीने राबविण्यात येणाऱ्या 'अमृत संवाद सेतू' या उपक्रमांतर्गत यवतमाळ येथील बाबाजी दाते महाविद्यालयाला सदिच्छा भेट देण्यात आली. यावेळी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. राजेश शिंगरू यांची भेट घेऊन अमृत संस्थेच्या विविध योजना, कौशल्य विकास, स्वयंरोजगार, शिक्षण, प्रशिक्षण तसेच समाजहिताच्या विविध उपक्रमांची सविस्तर माहिती देण्यात आली. 'अमृत संवाद सेतू' या उपक्रमाचा उद्देश शासकीय कार्यालये आणि विद्यार्थी या घटकांशी समन्वय साधून समाजोपयोगी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करणे हा असल्याचे यावेळी सांगण्यात आले. या चर्चेदरम्यान प्राचार्य डॉ. राजेश शिंगरू यांनी अमृत संस्थेच्या कार्याचे कौतुक करत महाविद्यालयामार्फत आवश्यक ते सहकार्य करण्याची सकारात्मक भूमिका व्यक्त केली. भविष्यात अमृतच्या विविध उपक्रमांच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी तसेच विद्यार्थ्यांपर्यंत योजनांची माहिती पोहोचविण्यासाठी महाविद्यालयामार्फत आवश्यक ते सहकार्य केले जाईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या भेटीमुळे अमृत संस्था व बाबाजी दाते महाविद्यालय यांच्यातील समन्वय अधिक दृढ होऊन विद्यार्थ्यांना व समाजाला विविध योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी सकारात्मक दिशा मिळणार असल्याचा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. अधिक माहितीसाठी संपर्क : परिक्षीत कमलकिशोर शर्मा जिल्हा व्यवस्थापक ९११२२२७६३३ जिल्हा कार्यालय पत्ता : स्वामी समर्थ विहार, पहिला माळा, फ्लॅट क्रमांक ए-१, अवधूतवाडी, तिवारी चौक, यवतमाळ - ४४५ ००१ ई-मेल : amrut.yavatmal.dm@gmail.com
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment