अमृत जिल्हा कार्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित ‘अपराजित योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवे – पराक्रम दिन’ या विशेष पोस्टरचे अनावरण नुकतेच संपन्न झाले.
अमृत जिल्हा कार्यालय, कोल्हापूर यांच्या वतीने आयोजित ‘अपराजित योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवे – पराक्रम दिन’ या विशेष पोस्टरचे अनावरण प्रमुख पाहुण्या सौ. दीपा अजित ठाणेकर (नगरसेविका तथा उपसभापती, महिला बालकल्याण समिती, कोल्हापूर महानगरपालिका) ,श्री. अजित ठाणेकर (उपाध्यक्ष, भाजपा कोल्हापूर महानगर) आणि श्री . अभय तेंडूलकर (भाजपा,शक्तिकेंद्र प्रमुख ) यांच्या शुभहस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले.
यावेळी प्रमुख पाहुण्यांनी पोस्टरचे अनावरण करून श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या अद्वितीय शौर्य, नेतृत्व, पराक्रम आणि राष्ट्रसेवेच्या प्रेरणादायी कार्याचा गौरव केला. इतिहासातील थोर व्यक्तिमत्त्वांचा आदर्श समाजापर्यंत आणि विशेषतः युवा पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांचे महत्त्व त्यांनी अधोरेखित केले. या पराक्रमदिनानिमित्त लवकरच राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. थोरल्या बाजीरावांचे कर्तृत्व या स्पर्धांच्या निमित्ताने आजच्या तरुण पिढीला पुन्हा एकदा नव्याने समजणार आहे.
या प्रसंगी उपस्थित मान्यवरांनी अमृत जिल्हा कार्यालय, कोल्हापूर यांच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या सामाजिक जनजागृती, कौशल्य विकास, स्वावलंबन आणि इतिहास संवर्धनाच्या उपक्रमांचे कौतुक केले. ‘पराक्रम दिन’ निमित्त साकारण्यात आलेले हे पोस्टर युवकांमध्ये राष्ट्रभक्ती, स्वाभिमान आणि इतिहासाविषयी अभिमान जागृत करणारे ठरेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला. तसेच सदर कार्यक्रमाच्यावेळी अमृत जिल्हाव्यवस्थापक कोल्हापूर श्री. अभिजीत कुलकर्णी , श्री.शिरीष कुलकर्णी व कु. सिद्धी गुर्जर यांनी अमृतच्या विविध योजनांबाबत माहिती सांगत अमृतचे महत्व अधोरेखित केले .कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी या ऐतिहासिक उपक्रमाला शुभेच्या देत त्याच्या यशस्वी योजनांसाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याची ग्वाही दिली .
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment