कारगील विजय दिनानिमित्त शहीद वीरांना भावपूर्ण अभिवादन

कारगील विजय दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे आयोजित कार्यक्रमात महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) हिंगोलीचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत धोतरे यांनी सहभाग नोंदवत कारगील युद्धातील शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली.

कारगील विजय दिनानिमित्त शहीद वीरांना भावपूर्ण अभिवादन मुख्य फोटो
मुख्य फोटो

कारगील विजय दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालय, हिंगोली येथे आयोजित करण्यात आलेल्या श्रद्धांजली कार्यक्रमात महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) हिंगोलीचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत धोतरे यांनी सहभाग नोंदवत कारगील युद्धातील शहीद वीर जवानांना विनम्र अभिवादन केले.

कार्यक्रमात जिल्हाधिकारी राहुल गुप्ता यांच्या हस्ते भारत मातेच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कारगील युद्धातील हुतात्मा जवानांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी कारगील युद्धातील शूर सैनिकांचे शौर्य, त्याग आणि राष्ट्रनिष्ठेचे स्मरण करण्यात आले.

कार्यक्रमास निवासी उपजिल्हाधिकारी तथा जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी अभिमन्यू बोधवड, उपजिल्हाधिकारी अनिल माचेवाड, जिल्ह्यातील माजी सैनिक, वीर पत्नी, वीर माता तसेच विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमात वीर पत्नी व वीर मातांचा शाल, श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला.

यावेळी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत धोतरे यांनी कार्यक्रमात सहभागी होत शहीद जवानांना श्रद्धांजली अर्पण केली. त्यांनी वीर जवानांच्या सर्वोच्च बलिदानाला विनम्र अभिवादन करत त्यांच्या शौर्यापासून प्रेरणा घेऊन राष्ट्रहित, समाजहित आणि युवकांमध्ये देशभक्तीची भावना जागृत करण्यासाठी अमृतच्या माध्यमातून सातत्याने कार्य करण्याचा संकल्प व्यक्त केला. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/



Publisher: Shrikant Dhotre News publisher name | Date: 27-07-2026 News publication date | Time: 05:06 PM News publication time | Views: 27 Number of times this news has been viewed | District: Hingoli Related district of the news
Publisher: Shrikant Dhotre News publisher name | Date: 27-07-2026 News publication date | Time: 05:06 PM News publication time | Views: 27 Number of times this news has been viewed | District: Hingoli Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement