अहिल्यानगर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' अंतर्गत विशेष प्रशासकीय शिबिराचे आयोजन

अहिल्यानगर मधील नागरिक तसेच अमृत संस्थेचे लाभार्थी, लक्षित गटातील सर्व महिला/पुरुष व युवक /युवती तसेच विद्यार्थी यांनी अहिल्यानगर शहर मतदारसंघातील या विशेष प्रशासकीय शिबिरास मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत कार्यालय अहिल्यानगर यांच्या वतीने करण्यात आले आहे.

अहिल्यानगर येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' अंतर्गत विशेष प्रशासकीय शिबिराचे आयोजन मुख्य फोटो
मुख्य फोटो

अहिल्यानगर : महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त तसेच स्वर्गीय उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त,अपर तहसील कार्यालय,अहिल्यानगर यांच्या वतीने 'छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व अभियान' अंतर्गत दिनांक ३१ जुलै रोजी "लक्ष्मी नारायण मंगल कार्यालय", टिळक रोड, नगर येथे विशेष प्रशासकीय शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात अमृत उद्योजकता विकास कार्यक्रम प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना मान्यवरांच्या शुभहस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच अमृत संस्थेच्या योजनांचा स्टॉल, त्याचप्रमाणे विविध शासकीय विभागांचे माहिती स्टॉल्स उभारण्यात येणार असून शासनाच्या विविध लोककल्याणकारी योजना, दाखले, अर्ज प्रक्रिया व प्रशासकीय सेवांबाबत नागरिकांना थेट मार्गदर्शन करण्यात येणार आहे. याशिवाय अमृत संस्थेच्या आगामी प्रशिक्षण कार्यक्रमांची, स्वयंरोजगाराच्या संधी व विविध उपक्रमांची माहितीही लाभार्थ्यांना उपलब्ध करून देण्यात येणार आहे. अमृत संस्थेचे लाभार्थी तसेच लक्षित गटातील/अहिल्यानगर मधील सर्व महिला/पुरुष व युवक/युवती तसेच विद्यार्थ्यांनी अहिल्यानगर शहर मतदारसंघातील या विशेष प्रशासकीय शिबिराला मोठ्या संख्येने उपस्थित राहून शासनाच्या विविध योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेचे अहिल्यानगर जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांच्या वतीने करण्यात आले आहे.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी,जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769 जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003

Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 27-07-2026 News publication date | Time: 10:51 AM News publication time | Views: 65 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 27-07-2026 News publication date | Time: 10:51 AM News publication time | Views: 65 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement