अहिल्यानगर मधील कर्जत येथे दि 01 ऑगस्ट रोजी विश्वहिंदू परिषद व मंदिर आर्चक पुरोहित संघ आयोजित आर्चक पुरोहित सेवा शिबिराचे आयोजन.
अहिल्यानगर मधील कर्जत येथे विश्वहिंदू परिषद व मंदिर आर्चक पुरोहित संघ आयोजित -आर्चक पुरोहित सेवा शिबिर
यामध्ये अमृत संस्था (महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था) यांच्या विविध शासकीय योजनांविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. त्याचबरोबर ई-श्रम कार्ड, विविध शासकीय योजना,आयुष्मान भारत कार्ड, आरोग्य तपासणी व इतर शासकीय सुविधांची माहिती दिली जाणार आहे. सर्व शासकीय योजनांची माहिती अमृत संस्थेचे अहिल्यानगर जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे हे देणार आहेत. या शिबीर मध्ये विशेष सत्कारमुर्ती श्री. विवेक दिनकर कुलकर्णी (राष्ट्रीय संयोजक, बजरंग दल),वेदशास्त्र संपन्न श्री. पांडुरंग शास्त्री देशमुख(सौताडा,जामखेड), श्री. मोहनबूवा रामदासी( अध्यक्ष-समर्थ रामदास स्वामी मठ, खातगाव),श्री. श्रीकांत नांदापूरकर (जिल्हासंपर्क प्रमुख-मंदिर ,अर्चक, पुरोहित आयाम,विश्वहिंदू परिषद, अहिल्यानगर) तसेच या कार्यक्रमाचे अध्यक्ष ऍड.सुधीर श्रीधर भापकर(प्रोप्रा. भापकर उद्योग समुह) हे असणार आहेत.
या कार्यक्रमाचे स्वागताध्यक्ष श्री. प्रसाद ढोकरीकर( नगरसेवक, कर्जत नगरपंचायत व अध्यक्ष-विश्वकर्मा शिक्षण संस्था, सदस्य- रोटरी कर्जत) हे आहेत.
शासकीय योजनांचाचा लाभ घेण्यासाठी नागरिकांनी नोंदणीसाठी आधार कार्ड सोबत आणण्याचे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे.
अधिक माहितीसाठी खालील क्रमांकांवर संपर्क करावा
जामखेड तालुकासाठी- रोहित देशमुख(7276672952), सचिन देशमुख (9423461044)
कर्जत तालुकासाठी - संदिप सागडे गुरूजी,आशिष निलंगे, वैभव महाजन, उमेश चावरे, रत्नाकर भणगे (9822285597)
या शिबिराचे आयोजक - ब्राम्हण सेवा संघ कर्जत व परशुराम प्रतिष्ठाण जामखेड,जि. अहिल्यानगर व परशुराम सेवा संघ पाटोदा हे आहेत. दिनांक : शनिवार, 01 ऑगस्ट 2026 वेळ : सकाळी 11:00 ते 4:00 वाजेपर्यंत स्थळ : साई खुशबू लॉज हॉटेल, कर्जत–बालवड रोड, कर्जत, जि.अहिल्यानगर. कर्जत, जामखेड व श्रीगोंदा मधील जास्तीत जास्त नागरिकांनी या शिबिराचा लाभ घ्यावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment