विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी भक्तीपर अभंग, प्रार्थना आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे उपस्थितांची मने जिंकली
आषाढी एकादशीच्या निमित्ताने परभणी परभणी शहरातील भगवान परशुराम संचलित वरद बालक मंदिर येथे अमृत संस्थेमार्फत अमृत वर्ग तसेच विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी भक्तिगीते, अभंग आणि विविध उपक्रमांमध्ये उत्स्फूर्त सहभाग घेतल्याने संपूर्ण परिसर भक्तिमय वातावरणाने भारावून गेला.यावेळी विद्यार्थ्यांनी विठ्ठल-रुक्मिणी भक्तीपर अभंग, प्रार्थना आणि विविध सांस्कृतिक सादरीकरणांद्वारे उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये भक्ती, संस्कार आणि सामाजिक मूल्यांची जपणूक करण्याची प्रेरणा निर्माण झाली.कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी अशा संस्कारवर्धक उपक्रमांचे कौतुक करत भविष्यातही अशा कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली. कार्यक्रमास वरद बालक मंदिराच्या संचालिका राजेश्री जोशी प्रमुख उपस्थित होत्या. तसेच अमृत सखी मयुरी टेळकीकर आणि अमृत मित्र अनंत जोगदंड यांनी विद्यार्थ्यांना आषाढी एकादशीचे महत्त्व, संत परंपरेचे विचार आणि संस्कारमूल्यांविषयी मार्गदर्शन केले.याप्रसंगी विद्यार्थ्यांना फळ वाटप करण्यात आले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment