अहिल्यानगर मधील कोपरगाव येथे महाराष्ट्र शासनाच्या "अमृत संस्था" अंतर्गत "अमृत पेठ – थेट बाजारपेठ" चे आयोजन करण्यात आले आहे.लवकरात लवकर आपला स्टॉल बुक करावा.
अहिल्यानगर मधील कोपरगाव येथे महाराष्ट्र शासनाच्या "अमृत संस्था" अंतर्गत "अमृत पेठ – थेट बाजारपेठ" चे आयोजन करण्यात आले आहे. "दर्जेदार खरेदीची खात्री.. अमृत पेठ तुमच्यासाठी ".. आता आनंद घेऊया तोही आपल्या कोपरगावमध्ये.. यामध्ये लघू-उद्योजकांसाठी आपली उत्पादने सादर करण्यासाठी एक उत्तम व्यासपीठ..!
खालील उत्पादन असलेल्या उद्योजकांनी आपला स्टॉल बुक करण्यासाठी संपर्क करावा व आपला स्टॉल बुक करावा.
स्वदेशी व दर्जेदार उत्पादने साड्यांचे अनेक प्रकार
हॅन्डमेड वस्तू
घरगुती पदार्थ(मसाले, पापड, फूड पॅकेट )
क्राफ व ज्वेलरी, बॅग
पूजा साहित्य,किड्स वस्तू
स्वादिष्ट खाद्य पदार्थ,इन्शुरन्स व सोलर कंपनी स्टॉल. याबरोबर सर्व शासकीय योजनांची माहिती व नोंदणी स्टॉल येथे असणार आहे.
दिनांक: १५ व १६ ऑगस्ट २०२६ रोजी
वेळ:- सकाळी ९ ते रात्री ९
स्थळ:-व्यापारी धर्मशाला,बस स्टॅन्ड समोर, कोपरगाव,अहिल्यानगर
अधिक माहितीसाठी व स्टॉल बुक करण्यासाठी संपर्क करा :- 8668327817 / 9112228769
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment