लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संभाजीनगर येथे संपन्न

महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) आणि ब्राह्मण समाज समन्वय समिती, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला.

लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संभाजीनगर येथे संपन्न  मुख्य फोटो
लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम संभाजीनगर येथे संपन्न  अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) आणि ब्राह्मण समाज समन्वय समिती, छत्रपती संभाजीनगर यांच्या संयुक्त विद्यमाने दिनांक २४ जुलै २०२६ रोजी वामन हरी पेठे ज्वेलर्सच्या खाली, स्वातंत्र्यवीर सावरकर चौक, समर्थ नगर, छत्रपती संभाजीनगर या ठिकाणी लोकमान्य बाळ गंगाधर टिळक जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम उत्साहात पार पडला. या कार्यक्रमाला ब्राह्मण समाजातील विविध संघटनांचे पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून त्यांना विनम्र अभिवादन करण्यात आले. त्यांच्या राष्ट्रसेवा, स्वराज्याचा विचार आणि समाजजागृतीच्या कार्याचा गौरव करत त्यांच्या विचारांना उजाळा देण्यात आला.

यावेळी अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध शासकीय योजना, कौशल्य विकास प्रशिक्षण, उद्योजकता विकास (EDP), स्वयंरोजगाराच्या संधी, कर्ज व अनुदान मार्गदर्शन तसेच इतर विविध उपक्रमांची सविस्तर माहिती उपस्थितांना देण्यात आली. युवक-युवती, महिला, विद्यार्थी आणि नागरिकांनी या योजनांचा लाभ घेऊन स्वतःचा उद्योग-व्यवसाय उभा करावा, असे आवाहन करण्यात आले.

याच कार्यक्रमात १८ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर साजरा होणाऱ्या "श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे पराक्रम दिन २०२६" निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहितीही देण्यात आली. या निमित्ताने विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. जिल्ह्यातील विद्यार्थी, युवक-युवती आणि इतिहासप्रेमींनी या स्पर्धांमध्ये मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. श्रीमंत थोरले बाजीराव पेशवे यांचे शौर्य, नेतृत्व आणि राष्ट्रनिष्ठेचा इतिहास नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा या उपक्रमामागील उद्देश असल्याचे सांगण्यात आले.

कार्यक्रमास उपस्थित सर्व मान्यवरांचे अमृत छत्रपती संभाजीनगर जिल्हा टीमच्या वतीने मनःपूर्वक स्वागत करण्यात आले. यावेळी सुरेश देशपांडे, मिलिंद दामोदरे, आदित्य धाराशिवकर, अभिषेक कादी, पंकज पाठक, जीवन जोशी, रवींद्र सुतवणे, श्रीपाद कुलकर्णी, कुणाल पाठक, कृष्णा देशपांडे आणि भीमराव कुलकर्णी उपस्थिती होते. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी,जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 25-07-2026 News publication date | Time: 04:36 PM News publication time | Views: 177 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 25-07-2026 News publication date | Time: 04:36 PM News publication time | Views: 177 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement