अहिल्यानगर अमृत कार्यालय येथे "पराक्रम दिन" चे मा.महेंद्र(भैय्या)गंधे ((राष्ट्रीय अध्यक्ष-अखिल भारतीय देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हण मध्यवर्ती मंडळ),(मा.जिल्हाध्यक्ष भाजपा अहिल्यानगर), (मा नगरसेवक- अहिल्यानगर महानगरपालिका) यांच्या हस्ते पोस्टर अनावरण संपन्न झाले.
श्रीमंत बाजीराव पेशव- "पराक्रम दिन" नर्मदे पलीकडे जाऊन उत्तर दिग्विजय करणारे वीर म्हणून पहिल्या बाजीराव पेशव्यांचे नाव आदराने घ्यावे लागेल. दक्षिणेतील श्रीरंगपट्टण पासून संपूर्ण मध्य आणि उत्तर भारत बाजीरावांनी मराठ्यांच्या अधिपत्त्याखाली आणला. अशा या महापराक्रमी योद्ध्याचा १८ ऑगस्ट २०२६ हा जयंती दिन आहे. त्यांच्या शौर्याचा आणि दिग्विजयाचा परिचय सर्व सामान्यांना व्हावा आणि या महान योद्ध्याचे स्मरण राहण्यासाठी अमृत संस्थेतर्फे महाराष्ट्रभर "पराक्रम दिन"साजरा करण्यात येणार आहे. त्यानिमित्त विविध राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.
या पराक्रम दिनाचे "पोस्टर अनावरण"अमृत नगर जिल्हा कार्यालय येथे मा श्री महेंद्र(भैय्या)गंधे(राष्ट्रीय अध्यक्ष-अखिल भारतीय देशस्थ ऋग्वेदी ब्राम्हण मध्यवर्ती मंडळ), (मा.जिल्हाध्यक्ष भाजपा अहिल्यानगर), (मा नगरसेवक- अहिल्यानगर महानगरपालिका) यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मा मंगेश निसळ (-युवा प्रदेशाध्यक्ष-अखिल भारतीय बहुभाषिय ब्राह्मण महासंघ ), मा ऍड.ऋग्वेद गंधे (नगरसेवक), मा. मुकेश साठ्ये (बॉण्ड संघटना), मा. सौरभ जोजार,मा. सुजल झुंजारे, कु.सायली कुलकर्णी व मा गौरी कुलकर्णी आदी उपस्थित होते. जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांनी उपस्थित मान्यवर यांचे आभार मानले.
कार्यक्रमास उपस्थित मान्यवरांनी अमृतच्या या अनोख्या उपक्रमाचे कौतुक केले. एकंदरीतच अमृतची कार्यपद्धती, लोकोपयोगी उपक्रम, अनोख्या स्पर्धा,त्याचे काटेकोर नियोजन याविषयी समाधान व्यक्त केले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी,जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769 जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment