अहिल्यानगर मधील श्रीगोंदा नगरपरिषदच्या मुख्याधिकारी मा.पुष्पगंधा भगत यांची भेट

अहिल्यानगर मधील अमृत मित्र वैभव कुलकर्णी यांनी मा श्री.पुष्पगंधा भगत(मुख्याधिकारी-श्रीगोंदा नगरपरिषद) यांची भेट घेतली.

अहिल्यानगर मधील श्रीगोंदा नगरपरिषदच्या मुख्याधिकारी मा.पुष्पगंधा भगत यांची भेट मुख्य फोटो
मुख्य फोटो

अहिल्यानगर मधील अमृत मित्र वैभव कुलकर्णी यांनी मा श्री.पुष्पगंधा भगत(मुख्याधिकारी-श्रीगोंदा नगरपरिषद) यांची भेट घेऊन अमृत योजनांची सविस्तर माहिती दिली.तसेच श्रीगोंदा तालुका येथे २२ ऑगस्ट मध्ये होणाऱ्या अमृत पेठसाठी निमंत्रण दिले.

यावेळी मा.मुख्याधिका-यांना अमृततर्फे घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रम आणि योजनांची माहिती सांगण्यात आली. असे विविध लोकोपयोगी उपक्रमांचे आयोजन करण्याबद्दल त्यांनी अमृतच्या कार्याचे कौतुक केले. अमृत संस्थेच्या कार्यासाठी सहकार्य करण्याची सकारात्मकता त्यांनी दर्शवली.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी,जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769 जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003

Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 25-07-2026 News publication date | Time: 01:23 PM News publication time | Views: 43 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 25-07-2026 News publication date | Time: 01:23 PM News publication time | Views: 43 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement