अहिल्यानगर अमृत कार्यालय येथे "अमृत मोबाईल फिल्म मेकिंग" प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वितरण संपन्न

अहिल्यानगर अमृत कार्यालय येथे "अमृत मोबाईल फिल्म मेकिंग" प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वितरण करण्यात आले.

अहिल्यानगर अमृत कार्यालय येथे "अमृत मोबाईल फिल्म मेकिंग" प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वितरण संपन्न मुख्य फोटो
अहिल्यानगर अमृत कार्यालय येथे "अमृत मोबाईल फिल्म मेकिंग" प्रशिक्षणाचे प्रमाणपत्र वितरण संपन्न अतिरिक्त फोटो

अहिल्यानगर अमृत कार्यालय येथे जानेवारी २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या "अमृत मोबाईल फिल्म मेकिंग" प्रशिक्षणाचे लाभार्थी यांना प्रमाणपत्र वितरण जिल्हा व्यवस्थापक सागर भोपे यांच्या हस्ते करण्यात आले.

प्रशिक्षण पुर्ण झाल्यावर यातील अनेकांना स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी मदत झाली.मोफत व उत्तम प्रशिक्षण मिळाल्याने लाभार्थी यांनी अमृत संस्थेचे आभार व्यक्त केले.

प्रमाणपत्र वितरण कार्यक्रमात उपस्थितांना अमृततर्फे घेण्यात येणाऱ्या विविध उपक्रम आणि योजनांची माहिती सांगण्यात आली. उपस्थितांनी अमृतच्या विविध योजना आणि उपक्रम यांविषयी समाधान व्यक्त केले. अशा उपक्रमांची समाजात असलेली गरजही यावेळी अधोरेखित करण्यात आली.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी,जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769 जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003

Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 25-07-2026 News publication date | Time: 01:20 PM News publication time | Views: 98 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 25-07-2026 News publication date | Time: 01:20 PM News publication time | Views: 98 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement