अपराजित योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या 'पराक्रम दिन' उपक्रमाच्या प्रचाराला आज देवगड येथील ऐतिहासिक लोकमान्य टिळक स्मारक येथे पोस्टर अनावरण सोहळ्याने उत्साहपूर्ण वातावरणात सुरुवात झाली.
देवगड, सिंधुदुर्ग : अपराजित योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या 'पराक्रम दिन' उपक्रमाच्या प्रचाराला आज देवगड येथील ऐतिहासिक लोकमान्य टिळक स्मारक येथे पोस्टर अनावरण सोहळ्याने उत्साहपूर्ण सुरुवात झाली. या प्रसंगी विविध सामाजिक, सांस्कृतिक व वैचारिक संस्थांचे पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सिंधुदुर्ग ब्राह्मण मंडळ, देवगड तालुका ब्राह्मण मंडळ तसेच वेदविद्या संवर्धन मंडळ यांच्या पदाधिकाऱ्यांनी या उपक्रमास उत्स्फूर्त पाठिंबा दर्शविला. यावेळी विभागीय व्यवस्थापक श्री. अमित जी सामंत यांनी पराक्रम दिनाविषयी माहिती दिली. पोस्टर अनावरण सोहळ्यास श्री. अनिल आपटे, श्री. दत्तात्रय गोगटे, श्री. केदार भिडे, श्री. चारुदत्त मराठे, श्री. निनाद देशपांडे, लोकमान्य टिळक स्मारकाचे बाळुकाका देसाई, स्वरूपानंद पतसंस्थेचे श्री. मुकेश लिमये तसेच श्री. सुयश मराठे यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी उपस्थित मान्यवरांनी अपराजित योद्धा श्रीमंत बाजीराव पेशवे यांचे अद्वितीय शौर्य, कुशल नेतृत्व, राष्ट्रनिष्ठा आणि पराक्रम नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता अधोरेखित केली. इतिहासातून प्रेरणा घेऊन समाजात राष्ट्रभक्ती, स्वाभिमान आणि पराक्रमाची भावना दृढ करण्यासाठी 'पराक्रम दिन' हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरेल, असा विश्वासही उपस्थितांनी व्यक्त केला. कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थितांनी पराक्रम दिन उपक्रमाला शुभेच्छा देत या ऐतिहासिक उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment