कुडाळ तालुका ब्राह्मण स्नेहमेळाव्यात अमृत संस्थेचा बोलबाला

योजनांची माहिती घेऊन लाभ घेण्याबद्दल व्यक्त करण्यात आली सकारात्मकता

कुडाळ तालुका ब्राह्मण स्नेहमेळाव्यात अमृत संस्थेचा बोलबाला मुख्य फोटो
कुडाळ तालुका ब्राह्मण स्नेहमेळाव्यात अमृत संस्थेचा बोलबाला अतिरिक्त फोटो

कुडाळ : सिंधुदुर्ग ब्राह्मण मंडळाच्या कुडाळ शाखेने नुकतेच वार्षिक स्नेहसंमेलनाचे आयोजन केले होते. ब्राह्मण समाजासह खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असलेल्या अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेला या स्नेहसंमेलनात आपल्या योजनांची माहिती देण्यासाठी मंडळाकडून बोलवण्यात आले होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक संदीप मणेरीकर यांनी केले. त्यानंतर अमृत संस्थेचे सिंधुदुर्ग जिल्हा व्यवस्थापक श्रीराम केळकर यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. त्यामध्ये त्यांनी अमृत संस्थेच्या सर्व योजनांची माहिती दिली. अमृत संस्थेच्या लक्ष्यित गटामध्ये ब्राह्मण समाजाचाही समावेश होत असल्याचे त्यांनी सांगितले. वैयक्तिक कर्ज व्याजपरतावा योजना, अमृत बेकरी प्रशिक्षण, अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण,अमृत आयात-निर्यात प्रशिक्षण, तसेच अमृत कौशल्यविकास कार्यक्रमांतर्गत विविध प्रशिक्षणांची माहिती या वेळी उपस्थितांना देण्यात आली. उपस्थितांकडून चांगला प्रतिसाद मिळाला आणि त्यांनी योजनांचा लाभ घेण्याच्या दृष्टीने सकारात्मकता दर्शवली. उपाध्यक्ष मंजुनाथ फडके यांनी आभारप्रदर्शन केले. संमेलनाला २००हून अधिक नागरिक उपस्थित होते.

अधिक माहितीसाठी संपर्क :
श्रीराम केळकर - 9112228760, 8554059044
सिंधुदुर्ग जिल्हा व्यवस्थापक - अमृत

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/

Publisher: Shriram Kelkar News publisher name | Date: 26-12-2025 News publication date | Time: 04:32 PM News publication time | Views: 64 Number of times this news has been viewed | District: sindhudurg Related district of the news
Publisher: Shriram Kelkar News publisher name | Date: 26-12-2025 News publication date | Time: 04:32 PM News publication time | Views: 64 Number of times this news has been viewed | District: sindhudurg Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words