अमृत पेठ थेट बाजारपेठ’ भव्य प्रदर्शनाचे आयोजन; स्थानिक उद्योजकांना व्यवसाय वृद्धीची सुवर्णसंधी

महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृत (AMRUT) यांच्या वतीने ‘अमृत पेठ थेट बाजारपेठ’ या भव्य प्रदर्शनाचे आयोजन दि. २६ जुलै २०२६ रोजी विकास सभागृह, विकासनगर, नागपूर येथे करण्यात आले आहे.

अमृत पेठ थेट बाजारपेठ’ भव्य प्रदर्शनाचे आयोजन; स्थानिक उद्योजकांना व्यवसाय वृद्धीची सुवर्णसंधी मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृत (Academy of Maharashtra Research, Upliftment and Training) यांच्या वतीने ‘अमृत पेठ थेट बाजारपेठ’ या भव्य प्रदर्शनाचे आयोजन रविवार, दि. २६ जुलै २०२६ रोजी विकास सभागृह, विकासनगर, गजानन महाराज मंदिराजवळ, नागपूर येथे करण्यात आले आहे. सकाळी १०.०० ते रात्री ९.०० या वेळेत हे प्रदर्शन नागरिकांसाठी खुले राहणार आहे. या उपक्रमाचा मुख्य उद्देश लघु, सूक्ष्म, महिला व गृहउद्योग उद्योजकांना थेट ग्राहकांपर्यंत पोहोचण्यासाठी व्यासपीठ उपलब्ध करून देणे हा आहे. प्रदर्शनामध्ये विविध प्रकारची हस्तकला, रेडीमेड वस्त्रे, घरगुती उत्पादने, खाद्यपदार्थ, दैनंदिन उपयोगाच्या वस्तू तसेच स्थानिक उद्योजकांची आकर्षक उत्पादने एकाच ठिकाणी पाहण्याची आणि खरेदी करण्याची संधी नागरिकांना मिळणार आहे. ग्राहकांना दर्जेदार वस्तू, आकर्षक ऑफर्स आणि स्थानिक उत्पादनांची विस्तृत श्रेणी उपलब्ध होणार असून, स्थानिक उद्योजकांच्या व्यवसायाला चालना देण्यासाठी हा उपक्रम महत्त्वपूर्ण ठरणार आहे. त्याचबरोबर "वोकल फॉर लोकल" या संकल्पनेलाही या प्रदर्शनातून बळ मिळणार आहे. आयोजकांनी नागपूरकर नागरिकांना कुटुंबासह प्रदर्शनाला भेट देऊन स्थानिक उद्योजकांना प्रोत्साहन देण्याचे आवाहन केले आहे. ‘अमृत पेठ थेट बाजारपेठ’ हे प्रदर्शन उद्योजक आणि ग्राहक यांच्यातील थेट दुवा निर्माण करणारे तसेच स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना देणारे एक महत्त्वपूर्ण व्यासपीठ ठरणार असल्याचा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Aaditya Avadhut Kulkarni News publisher name | Date: 24-07-2026 News publication date | Time: 04:23 PM News publication time | Views: 46 Number of times this news has been viewed | District: Nagpur Related district of the news
Publisher: Aaditya Avadhut Kulkarni News publisher name | Date: 24-07-2026 News publication date | Time: 04:23 PM News publication time | Views: 46 Number of times this news has been viewed | District: Nagpur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement