बाजीराव पेशवे यांची अद्वितीय शौर्य, दूरदृष्टी, राष्ट्रनिष्ठा आणि नेतृत्वगुणांवर प्रकाश ताकत येणार आहे.या उपक्रमामुळे इतिहासातील तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचे कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार असून युवकांमध्ये राष्ट्रप्रेम, शौर्य आणि कर्तव्यभावनेची प्रेरणा निर्माण होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
अलिबाग : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) रायगड जिल्हा कार्यालय, अलिबाग येथे आज अपराजित योद्धा थोरले बाजीराव पेशवे यांच्या पराक्रम दिनानिमित्त विविध प्रेरणादायी उपक्रमांचे उद्घाटन उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून विश्व हिंदू परिषद, अलिबागचे श्री. श्रीराम ठोसर, ॲड. मिलिंद आठवले, श्री. समीर दिघे तसेच उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) श्री. श्रीकांत गायकवाड यांनी प्रमुख उपस्थिती दर्शविली. कार्यक्रमाच्या प्रारंभी अपराजित योद्धा थोरले बाजीराव पेशवे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी बाजीराव पेशवे यांच्या अद्वितीय शौर्य, दूरदृष्टी, राष्ट्रनिष्ठा आणि नेतृत्वगुणांवर प्रकाश टाकत त्यांच्या पराक्रमातून प्रेरणा घेऊन राष्ट्रसेवा, समाजहित आणि स्वाभिमान जपण्याचे आवाहन केले. यावेळी अमृत रायगड जिल्हा अलिबाग कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या विशेष उपक्रमांचा शुभारंभ मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला. कार्यक्रमास उपस्थितांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत बाजीराव पेशवे यांच्या कार्याचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला. या उपक्रमामुळे इतिहासातील तेजस्वी व्यक्तिमत्त्वाचे कार्य जनसामान्यांपर्यंत पोहोचण्यास मदत होणार असून युवकांमध्ये राष्ट्रप्रेम, शौर्य आणि कर्तव्यभावनेची प्रेरणा निर्माण होईल, असा विश्वास उपस्थित मान्यवरांनी व्यक्त केला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment