महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत परभणी जिल्हा कार्यालयात सुरू असलेल्या उद्योजकता विकास प्रशिक्षण (EDP) कार्यक्रमाचा चौथा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.
महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) या महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत परभणी जिल्हा कार्यालयात सुरू असलेल्या उद्योजकता विकास प्रशिक्षण (EDP) कार्यक्रमाचा चौथा दिवस उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. यावेळी "अमृत पेठ- ऑनलाइन/ऑफलाईन" या महत्त्वाच्या विषयावर जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे उपव्यवस्थापक रवि कुलकर्णी, अमृत सखी मयुरी टेळकीकर यांनी मार्गदर्शन केले. व्यावसायिकांना अमृत पेठ ही संकल्पना स्पष्ट करून त्यांचे उत्पादन जास्तीत जास्त ग्राहकांपर्यंत पोहोचवण्यासाठी अमृत पेठ ई-कॉमर्सचा वापर, उत्पादने अपलोड करणे, तसेच प्रदर्शन व विक्री याबाबत प्रात्यक्षिकासह सोप्या भाषेत माहिती दिली. या मार्गदर्शन सत्राला प्रशिक्षणार्थींनी सकारात्मक प्रतिसाद दिला. सहभागी उद्योजकांनी विविध प्रश्न विचारून आपल्या व्यवसायासाठी उपयुक्त माहिती जाणून घेतली. प्रश्नोत्तरानंतर उद्योजकता विकास प्रशिक्षणाचा (EDP) या ऑफलाईन सत्राचा समारोप झाला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment