महापराक्रमी योद्धा पेशवा बाजीराव प्रथम यांचा १८ ऑगस्ट २०२६ हा जयंती दिन आहे. त्यांच्या शौर्याचा आणि दिग्विजयाचा परिचय सर्व सामान्यांना व्हावा आणि या महान योद्ध्याचे स्मरण राहण्यासाठी अमृत संस्थेतर्फे पराक्रम दिन साजरा करण्यात येत आहे.
"४१ लढाया, ४१ विजय आणि एकही पराभव नाही" ही श्रीमंत बाजीराव पेशव्यांच्या पराक्रमाची प्रसिद्ध ऐतिहासिक ओळख आहे. श्रीमंत बाजीरावांना पेशवेपद सन १७२० मध्ये, वयाच्या सुमारे १९–२०व्या वर्षी मिळाले. सुमारे १९ वर्षाच्या कारकीर्दीत दक्षिणेतील श्रीरंगपट्टन पासून संपूर्ण मध्य आणि उत्तर भारत मराठ्यांच्या अधिपत्त्याखाली आणलं. त्यांच्या विजयी मोहिमांनी मराठा साम्राज्याचा गौरव दूरवर पोहोचवून इतिहासात अजरामर स्थान निर्माण केले.
अशा या महापराक्रमी योद्ध्याचा १८ ऑगस्ट २०२६ हा जयंती दिन आहे. त्यांच्या शौर्याचा आणि दिग्विजयाचा परिचय सर्व सामान्यांना व्हावा आणि या महान योद्ध्याचे स्मरण राहण्यासाठी अमृत संस्थेतर्फे पराक्रम दिन साजरा करण्यात येणार आहे- “श्रीमंत थोरले बाजीराव - अपराजित योद्धा”. त्यानिमित्त राज्यस्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे. या पराक्रम दिनाचे आज लोकमान्य टिळक व चंद्रशेखर आझाद यांच्या जयंतीदिनी भंडारा येथील श्री बहिरंगेश्वर महाराज मंदिर तसेच श्री लक्ष्मी नारायण मंदिर येथे पोस्टर अनावरण करण्यात आले.
या छोटेखानी कार्यक्रमास श्री. हरिप्रसाद मिश्रा – बहु भाषिक ब्राह्मण संघ अध्यक्ष, श्री. प्रकाश दुबे, श्री. दुबेजी महाराज – पुजारी श्री लक्ष्मी नारायण मंदिर, श्री. विनायकराव याज्ञीक पुजारी श्री बहिरंगेश्वर महाराज मंदिर, श्री. देशपांडे, श्री. उमाळकर, श्री. शनवारे, श्री. ओमकार हरदास (जिल्हा व्यवस्थापक- भंडारा, अमृत) तसेच अन्य समाज बांधव उपस्थित होते.
लवकरच या स्पर्धेचे पुढील नियोजन आणि स्वरूप जाहीर होणार आहे.
अधिक माहितीकरीता संपर्क करा ९११२२२८७७५/८८५७९३४७३२ - भंडारा जिल्हा अमृत कार्यालय.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment