श्रीमंत बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त 'पराक्रम दिन' पोस्टरचे अनावरण

लातूर : श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या जयंतीचे औचित्य साधून अमृत संस्थेमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या 'पराक्रम दिन' उपक्रमाच्या पोस्टरचे अनावरण आज मान्यवरांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले.

श्रीमंत बाजीराव पेशवे जयंतीनिमित्त 'पराक्रम दिन' पोस्टरचे अनावरण मुख्य फोटो
मुख्य फोटो

लातूर : श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या जयंतीचे औचित्य साधून अमृत संस्थेमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या 'पराक्रम दिन' उपक्रमाच्या पोस्टरचे अनावरण आज मान्यवरांच्या हस्ते उत्साहात करण्यात आले. या पोस्टरचे अनावरण MCED चे प्रकल्प अधिकारी श्री दीपक गायकवाड सर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपस्थित मान्यवरांना अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री शुभम मुळजकर यांनी पराक्रम दिनानिमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांची सविस्तर माहिती दिली. तसेच अमृतचे जिल्हा उपव्यवस्थापक श्री चिंतेश जोशी यांनी अमृत संस्थेच्या विविध योजना, उपक्रम आणि युवकांसाठी उपलब्ध असलेल्या संधींबाबत मार्गदर्शन केले. या प्रसंगी सोलार उद्योजक श्री अमोल कुलकर्णी यांची विशेष उपस्थिती लाभली. तसेच श्री सुशील गायकवाड सर, श्री अमोल दिवेकर सर, श्री प्रसाद कुलकर्णी, श्री संतोष तिवारी, श्री कौस्तुभ जोशी, श्री वसंत कुलकर्णी, श्री कृष्णा कुलकर्णी, श्री गजानन पांडे, श्री गंगाधर रेकावार, श्री वैभव कुलकर्णी, श्री हेमंत दिवाण, श्री अनिकेत रामदासी, श्री भगवंत देशपांडे, श्री परमानंद ओझा, श्री चंदन अट्टल, श्री अविनाश गिरवलकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. 'पराक्रम दिन' या उपक्रमाच्या माध्यमातून श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या शौर्य, पराक्रम, राष्ट्रनिष्ठा आणि नेतृत्वगुणांचा वारसा युवकांपर्यंत पोहोचविण्याचा अमृत संस्थेचा प्रयत्न असून, या उपक्रमाला उपस्थितांनी शुभेच्छा देत आयोजनाचे कौतुक केले. नावनोंदणी आणि अधिक माहितीसाठी संपर्क : शुभम मुळजकर जिल्हा व्यवस्थापक,लातूर अमृत कार्यालय,लातूर संपर्क क्रमांक- 7391065470 पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट ,सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,लातूर तालुका, जिल्हा लातूर-413512

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Kamalakshi Kulkarni News publisher name | Date: 24-07-2026 News publication date | Time: 01:05 PM News publication time | Views: 128 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news
Publisher: Kamalakshi Kulkarni News publisher name | Date: 24-07-2026 News publication date | Time: 01:05 PM News publication time | Views: 128 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement