संतनगरी शेगावमध्ये लवकरच बेकरी प्रशिक्षण कार्यक्रम

खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी सुवर्णसंधी; त्वरित नावनोंदणी करण्याचे आवाहन

संतनगरी शेगावमध्ये लवकरच बेकरी प्रशिक्षण कार्यक्रम मुख्य फोटो
मुख्य फोटो

शेगाव : बुलढाणा जिल्ह्यातील संतनगरी शेगाव येथे महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत या राज्य शासनाच्या स्वायत्त संस्थेतर्फे लवकरच बेकरी प्रशिक्षण कार्यक्रम सुरू करण्यात येणार आहे. अमृत ही संस्था खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांसाठी कार्यरत असून, या घटकांकरिता रोजगारनिर्मिती, स्वयंरोजगार आणि उद्योजकतेला चालना देणे हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत बेकरी व्यवसायासाठी आवश्यक तांत्रिक ज्ञान आणि प्रात्यक्षिकांसह प्रशिक्षण दिले जाणार असून, व्यवसाय सुरू करण्याबाबत सखोल मार्गदर्शन देण्यात येणार आहे. प्रशिक्षण पूर्ण केल्यानंतर सहभागी उमेदवारांना स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी आवश्यक आत्मविश्वास, कौशल्य आणि व्यावसायिक दृष्टिकोन प्राप्त होणार आहे. या योजनेचा लाभ खुल्या प्रवर्गातील पात्र युवक-युवतींनी मोठ्या संख्येने घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

शेगावसह परिसरातील पात्र युवक-युवतींनी या संधीचा लाभ घेण्यासाठी पुढे यावे, असे आवाहन अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांनी केले आहे. “स्वतःच्या पायावर उभे राहण्यासाठी कौशल्याधारित प्रशिक्षण ही काळाची गरज आहे आणि अमृत संस्था ही संधी खुली करत आहे,” असे त्यांनी नमूद केले.

शेगाव व परिसरातील इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी या बेकरी प्रशिक्षण कार्यक्रमात जास्तीत जास्त संख्येने सहभाग घ्यावा, असे आवाहन अमृत संस्थेच्या वतीने करण्यात येत आहे.

संपर्क : जिग्नेश कमानी 9112227637
बुलढाणा जिल्हा व्यवस्थापक, अमृत

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in

Publisher: Jignesh Kamani News publisher name | Date: 26-12-2025 News publication date | Time: 04:00 PM News publication time | Views: 451 Number of times this news has been viewed | District: buldhana Related district of the news
Publisher: Jignesh Kamani News publisher name | Date: 26-12-2025 News publication date | Time: 04:00 PM News publication time | Views: 451 Number of times this news has been viewed | District: buldhana Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words