अपराजित योद्धा -श्रीमंत श्री. बाजीराव पेशवे पराक्रम दिनानिमित्त राज्यभर विविध स्पर्धांचे आयोजन; सातारा येथे पोस्टरचे अनावरण
सातारा : महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था यांच्या वतीने १८ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर साजऱ्या होणाऱ्या "थोरले बाजीराव पेशवे पराक्रम दिन २०२६" निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा व उपक्रमांच्या अधिकृत पोस्टरचे अनावरण भारतीय मजदूर संघ,सातारा यांच्या जिल्हा कार्यालयात करण्यात आले. या कार्यक्रमाला श्री. प्रवीण देशपांडे,(सेवा भारती, संयोजक ) श्री. रवींद्र ताथवडेकर (विश्व हिंदू परिषद,संयोजक ) ,श्री. राजेंद्र काळे (भारतीय मजदूर संघ, प. महाराष्ट्र विभाग संघटक ),श्री.संजय देशपांडे,(वाहक संघटना, सातारा जिल्हा अध्यक्ष ) श्री. शामरव गोळे (भारतीय मजदूर संघ माजी अध्यक्ष ), श्री. रवी माने (भारतीय मजदूर संघ,सरचिटणीस ) तसेच इतर मान्यवर उपस्थित होते. यावर्षी "अपराजित योद्धा" थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा समाजापर्यंत पोहोचावी, या उद्देशाने राज्यभर निबंध, वक्तृत्व, काव्यलेखन, रील निर्मिती आणि नाट्यसंहिता लेखन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment