यवतमाळ : भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रणेते, राष्ट्रपुरुष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती यवतमाळ येथील टिळकवाडी येथील लोकमान्य टिळक यांच्या तेलचित्रास पुष्पहार अर्पण करून उत्साहात साजरी करण्यात आली.
यवतमाळ : भारतीय स्वातंत्र्यलढ्याचे प्रणेते, राष्ट्रपुरुष लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती यवतमाळ येथील टिळकवाडी येथील लोकमान्य टिळक यांच्या तेलचित्रास पुष्पहार अर्पण करून उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाचे आयोजन युवा ब्राह्मण संघ व अमृत जिल्हा कार्यालय, यवतमाळ यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आले होते. कार्यक्रमात युवा ब्राह्मण संघ तसेच अमृत जिल्हा कार्यालय, यवतमाळ यांच्या प्रतिनिधींनी मोठ्या उत्साहाने सहभाग नोंदवून लोकमान्य टिळकांना अभिवादन केले. कार्यक्रमाचे प्रमुख वक्ते ॲड. श्रेयस भावे यांनी लोकमान्य टिळक यांच्या राष्ट्रसेवेचा, स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाचा तसेच "स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच" या त्यांच्या प्रेरणादायी विचारांचा आढावा घेतला. त्यांनी उपस्थित तरुणांना टिळकांचे विचार आत्मसात करून राष्ट्रनिर्माणासाठी सक्रिय योगदान देण्याचे आवाहन केले. यावेळी टिळकवाडी मित्र मंडळाचे अतुलजी गंजीवाले, अतुल दंडे, सचिन चक्रावत यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेस पुष्पांजली अर्पण करून विनम्र अभिवादन केले. अधिक माहितीसाठी संपर्क : परिक्षीत कमलकिशोर शर्मा जिल्हा व्यवस्थापक ९११२२२७६३३ जिल्हा कार्यालय पत्ता : स्वामी समर्थ विहार, पहिला माळा, फ्लॅट क्रमांक ए-१, अवधूतवाडी, तिवारी चौक, यवतमाळ - ४४५ ००१ ई-मेल : amrut.yavatmal.dm@gmail.com
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment