अमृतच्या योजनांसाठी मिळणार प्रशासनाचे सहकार्य- उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांचे आश्वासन

सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी अमृतच्या कार्याचे कौतुक करत या योजनांच्या अंमलबजावणीसाठी प्रशासनाकडून आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन दिले.

अमृतच्या योजनांसाठी मिळणार प्रशासनाचे सहकार्य- उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांचे आश्वासन मुख्य फोटो
मुख्य फोटो

अमृतच्या योजनांसाठी प्रशासनाचे सहकार्य; उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांचे आश्वासन. सिल्लोड : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृतच्या विविध जनकल्याणकारी योजनांची माहिती देण्यासाठी अमृतचे जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे यांनी सिल्लोडचे उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांची उपविभागीय कार्यालयात सदिच्छा भेट घेतली. या भेटीदरम्यान रोडे यांनी अमृतच्या शैक्षणिक योजना, व्याज परतावा योजना, कौशल्य विकास, स्वयंरोजगार तसेच विविध लोकाभिमुख उपक्रमांची सविस्तर माहिती दिली. या योजनांचा अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांना लाभ मिळावा यासाठी प्रशासनाच्या सहकार्याबाबतही चर्चा झाली.

यावेळी उपविभागीय अधिकारी प्रवीण फुलारी यांनी अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांचे कौतुक केले. शासनाच्या योजनांचा लाभ नागरिकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्यात येईल, तसेच प्रशासनाकडून लागणारी मदत देण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: योगेश रोडे News publisher name | Date: 23-07-2026 News publication date | Time: 11:04 PM News publication time | Views: 44 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: योगेश रोडे News publisher name | Date: 23-07-2026 News publication date | Time: 11:04 PM News publication time | Views: 44 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement