वरोरा येथे 'श्रीमंत बाजीराव पेशवे पराक्रम दिन २०२६' स्पर्धांच्या पोस्टरचे अनावरण

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या वतीने 'थोरले बाजीराव पेशवे पराक्रम दिन २०२६' निमित्त आयोजित विविध स्पर्धा व जनजागृती उपक्रमांच्या अधिकृत पोस्टरचे अनावरण वरोरा येथील अटल बिहारी वाजपेयी वाचनालयात करण्यात आले.

वरोरा येथे 'श्रीमंत बाजीराव पेशवे पराक्रम दिन २०२६' स्पर्धांच्या पोस्टरचे अनावरण मुख्य फोटो
मुख्य फोटो

यावेळी निबंध, वक्तृत्व, काव्यलेखन, रील निर्मिती व नाट्यसंहिता लेखन स्पर्धांची माहिती देत विद्यार्थी, युवक-युवती व नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. या कार्यक्रमास आदित्य सेंगर, प्रफुल ढोके, पीयूष दांडेकर तसेच वरोरा येथील विद्यार्थी उपस्थित होते. इतिहासातून प्रेरणा घेऊन युवकांमध्ये राष्ट्रप्रेम, नेतृत्वगुण आणि सर्जनशीलता वाढीस लागेल, असा विश्वास यावेळी व्यक्त करण्यात आला. अधिक माहितीसाठी संपर्क - 9112228774, 9607443742 अमृत जिल्हा कार्यालय, चंद्रपूर पत्ता : गुरुद्वारा रोड, कृष्णा टॉवरजवळ, तुकूम, चंद्रपूर - 442402 ई-मेल : amrut.chandrapur.dm@mail.com


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/



Publisher: आदित्य सेंगर News publisher name | Date: 23-07-2026 News publication date | Time: 08:48 PM News publication time | Views: 46 Number of times this news has been viewed | District: Chandrapur Related district of the news
Publisher: आदित्य सेंगर News publisher name | Date: 23-07-2026 News publication date | Time: 08:48 PM News publication time | Views: 46 Number of times this news has been viewed | District: Chandrapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement