बल्लारपूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 'श्रीमंत बाजीराव पेशवे पराक्रम दिन २०२६' स्पर्धांच्या पोस्टरचे अनावरण

महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था यांच्या वतीने १८ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर साजऱ्या जाणाऱ्या "थोरले बाजीराव पेशवे पराक्रम दिन २०२६" निमित्त आयोजित विविध स्पर्धांच्या अधिकृत पोस्टरचे अनावरण बल्लारपूर येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) येथे उत्साहात करण्यात आले.

बल्लारपूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 'श्रीमंत बाजीराव पेशवे पराक्रम दिन २०२६' स्पर्धांच्या पोस्टरचे अनावरण मुख्य फोटो
बल्लारपूर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत 'श्रीमंत बाजीराव पेशवे पराक्रम दिन २०२६' स्पर्धांच्या पोस्टरचे अनावरण अतिरिक्त फोटो

या कार्यक्रमाला शासकीय आयटीआय, बल्लारपूरचे प्राचार्य श्री. खडवेकर सर , संस्थेतील शिक्षकवृंद, कर्मचारी तसेच मोठ्या संख्येने विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी अमृतचे जिल्हा व्यवस्थापक श्री. विक्रममोहन पांडे, अमृत मित्र श्री. सतीश नारायणदास, आयटीआयचे प्राचार्य, शिक्षक व विद्यार्थी यांनी कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी उपस्थितांना "थोरले बाजीराव पेशवे पराक्रम दिन २०२६" निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धांची सविस्तर माहिती देण्यात आली. यामध्ये निबंध लेखन, वक्तृत्व स्पर्धा, काव्यलेखन, रील निर्मिती आणि नाट्यसंहिता लेखन अशा विविध स्पर्धांचा समावेश असून विद्यार्थी, युवक-युवती तसेच सर्वसामान्य नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहन करण्यात आले. यावर्षी "अपराजित योद्धा" म्हणून ओळखल्या जाणाऱ्या थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्य, पराक्रम, नेतृत्वगुण, राष्ट्रनिष्ठा आणि प्रेरणादायी कार्याचा वारसा समाजापर्यंत, विशेषतः युवा पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी संपर्क - 9112228774, 9607443742, 7057909073, 9890746453 अमृत जिल्हा कार्यालय, चंद्रपूर पत्ता - कृष्णा टावर जवळ, गुरुद्वारा रोड , चंद्रपूर



अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/



Publisher: आदित्य सेंगर News publisher name | Date: 23-07-2026 News publication date | Time: 08:32 PM News publication time | Views: 57 Number of times this news has been viewed | District: Chandrapur Related district of the news
Publisher: आदित्य सेंगर News publisher name | Date: 23-07-2026 News publication date | Time: 08:32 PM News publication time | Views: 57 Number of times this news has been viewed | District: Chandrapur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement