आर्वीतील शिवाजी प्राथमिक शाळेत शनिवारपासून ‘अमृत वर्ग’ उपक्रमाचा शुभारंभ

विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास, संस्कार, शिस्त, राष्ट्रप्रेम आणि नेतृत्वगुण विकसित करण्याच्या उद्देशाने अमृत महाराष्ट्रतर्फे राबविण्यात येणारा अमृत वर्ग उपक्रम आता आर्वी शहरात सुरू होत आहे.

आर्वीतील शिवाजी प्राथमिक शाळेत शनिवारपासून ‘अमृत वर्ग’ उपक्रमाचा शुभारंभ मुख्य फोटो
आर्वीतील शिवाजी प्राथमिक शाळेत शनिवारपासून ‘अमृत वर्ग’ उपक्रमाचा शुभारंभ अतिरिक्त फोटो

आर्वी, जि. वर्धा : विद्यार्थ्यांमध्ये उत्तम संस्कार रुजविणे, शिस्तप्रिय जीवनशैली विकसित करणे, शारीरिक तंदुरुस्ती, बौद्धिक क्षमता, नेतृत्वगुण आणि सामाजिक बांधिलकी निर्माण करणे या उद्देशाने अमृत महाराष्ट्र तर्फे राबविण्यात येणाऱ्या अमृत वर्ग उपक्रमाचा विस्तार आर्वी शहरात होत असून, शिवाजी प्राथमिक शाळा, नगरपरिषद आर्वी येथे येत्या शनिवारपासून अमृत वर्गांना प्रारंभ होणार आहे.


या पार्श्वभूमीवर आज शाळेच्या मुख्याध्यापिका यांची भेट घेऊन अमृत वर्गाची संपूर्ण कार्यपद्धती, वर्गाचे स्वरूप आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी या उपक्रमाचे महत्त्व याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. शाळेच्या मुख्याध्यापिका यांनी या उपक्रमाचे स्वागत करत विद्यार्थ्यांच्या हितासाठी शाळेकडून पूर्ण सहकार्य करण्याची तयारी दर्शविली.


अमृत वर्ग हा केवळ अभ्यासाचा वर्ग नसून विद्यार्थ्यांच्या व्यक्तिमत्त्व विकासाची एक प्रभावी चळवळ आहे. या वर्गामध्ये प्रार्थना, मंडळ कृती, शरीर शिथिलीकरण, सूर्यनमस्कार, बैठेखेळ, आज्ञा अभ्यास, मैदानी खेळ, प्रेरणादायी गीते, गोष्टी, बौद्धिक कार्यक्रम, राष्ट्रीय घोषणा आणि शांतिमंत्र अशा विविध उपक्रमांचा समावेश आहे. या सर्व उपक्रमांचे नियोजन विद्यार्थ्यांचे वय, क्षमता आणि मानसिक विकास लक्षात घेऊन करण्यात आले आहे.


दररोज ६० मिनिटांच्या या वर्गामधून विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, वेळेचे नियोजन, संघभावना, नेतृत्व, शिस्त, देशभक्ती, सामाजिक जबाबदारी आणि सकारात्मक विचारसरणी विकसित करण्यावर भर दिला जातो. शिक्षणाबरोबरच जीवनमूल्ये आणि उत्तम नागरिक घडविण्याची प्रेरणा देणे हा अमृत वर्गाचा मुख्य हेतू आहे.


येत्या शनिवारपासून शिवाजी प्राथमिक शाळा, नगरपरिषद आर्वी येथे अमृत वर्गांना नियमित सुरुवात होणार असून, या उपक्रमाचा लाभ शाळेतील विद्यार्थ्यांना मिळणार आहे. विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास घडविण्याच्या दिशेने हा उपक्रम निश्चितच महत्त्वपूर्ण ठरणार असून, भविष्यात आर्वी तालुक्यातील अधिकाधिक शाळांमध्ये अमृत वर्ग सुरू करण्याचा मानस व्यक्त करण्यात आला आहे. माहितीसाठी संपर्क : ९११२२२७६३२ पत्ता : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) प्रशासकीय भवन, तळमजला, जिल्हाधिकारी कार्यालय परिसर, सिव्हिल लाईन, वर्धा. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Dhiraj Rathi News publisher name | Date: 23-07-2026 News publication date | Time: 08:24 PM News publication time | Views: 190 Number of times this news has been viewed | District: Wardha Related district of the news
Publisher: Dhiraj Rathi News publisher name | Date: 23-07-2026 News publication date | Time: 08:24 PM News publication time | Views: 190 Number of times this news has been viewed | District: Wardha Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 1 Comments

A
Anand Oak
27-07-2026 10:53 AM

Amurt path team Pune and all maharshtra State term Very good working and AMRUT ful pasun Agerbatti and Dhoop batti Tring program start in amurt path Amravati City district officer coming soon application form give Star today. Please request contact amurt path Amravati district office.

Write a Comment
0 / 50 words
Advertisement