नाशिक अमृत कार्यालयात श्रीमंत थोरले बाजीराव - अपराजित योद्धा- पराक्रम दिनाचे पोस्टर अनावरण झाले.
नर्मदे पलीकडे जाऊन उत्तर दिग्विजय करणारा वीर म्हणून पहिल्या बाजीराव पेशव्यांचे नाव आदराने घ्यावे लागेल. दक्षिणेतील श्रीरंगपट्टण पासून संपूर्ण मध्य आणि उत्तर भारत बाजीरावांनी मराठ्यांच्या अधिपत्त्याखाली आणला. अशा या महापराक्रमी योद्ध्याचा १८ ऑगस्ट २०२६ हा जयंती दिन आहे. त्यांच्या शौर्याचा आणि दिग्विजयाचा परिचय सर्व सामान्यांना व्हावा आणि या महान योद्ध्याचे स्मरण राहण्यासाठी अमृत संस्थेतर्फे पराक्रम दिन साजरा करण्यात येणार आहे-श्रीमंत थोरले बाजीराव - अपराजित योद्धा.
त्यानिमित्त विविध राज्यस्तरीय स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.या पराक्रम दिनाचे आज पोस्टर अनावरण करण्यात आले. अमृत नाशिक कार्यालयात झालेल्या या छोटेखानी कार्यक्रमास श्री.चंद्रशेखर बर्वे,(श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या मामाचे वंशज) श्री.भूषण जुन्नरे ( ब्राह्मण महासंघ प्रदेश अध्यक्ष )
श्री.धनंजय पाठक व श्री.गौरव बडवे (नासिक रोड ब्राह्मण सभा पदाधिकारी) , श्री. मंगेश खाडिलकर ( अमृत विभागीय व्यवस्थापक- कोकण) आणि अमृत नाशिक टीम सदस्य उपस्थित होते.
लवकरच या स्पर्धेचे पुढील नियोजन आणि स्वरूप जाहीर होणार आहे.
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment