अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण कार्यक्रमाचा लातूर येथे उत्साहात समारोप

लातूर: अमृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर येथील IT पार्क येथे आयोजित अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण कार्यक्रमाचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप करण्यात आला.

अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण कार्यक्रमाचा लातूर येथे उत्साहात समारोप मुख्य फोटो
अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण कार्यक्रमाचा लातूर येथे उत्साहात समारोप अतिरिक्त फोटो

 लातूर : अमृत व महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) यांच्या संयुक्त विद्यमाने लातूर येथील IT पार्क येथे आयोजित अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण कार्यक्रमाचा उत्साहपूर्ण वातावरणात समारोप करण्यात आला. सौरऊर्जा क्षेत्रातील वाढत्या संधींच्या पार्श्वभूमीवर युवकांना तांत्रिक कौशल्ये, रोजगाराच्या संधी तसेच स्वयंरोजगारासाठी आवश्यक मार्गदर्शन मिळावे, या उद्देशाने या प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमास ऑनलाइन माध्यमातून अमृतचे व्यवस्थापकीय संचालक श्री. विजय जोशी, श्री. मंगेश खाडिलकर, श्री. अमित सामंत, MCED चे राज्य समन्वयक श्री. श्रीकांत कुलकर्णी, विभाग प्रमुख श्री. प्रदीप इंगळे तसेच विभागीय अधिकारी श्री. सुदाम थोटे यांनी सहभाग नोंदवत प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले. मान्यवरांनी सौरऊर्जा क्षेत्राचे वाढते महत्त्व अधोरेखित करत या क्षेत्रात उपलब्ध असलेल्या विविध संधींचा प्रशिक्षणार्थींनी लाभ घ्यावा, असे आवाहन केले. या कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणून नगरसेवक श्री. प्रवीणदादा कस्तुरे उपस्थित होते. यावेळी श्री. प्रवीणदादा कस्तुरे यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन करत सौरऊर्जा क्षेत्रातील वाढत्या संधींचा लाभ घेऊन प्रशिक्षणाचा उपयोग रोजगार व स्वयंरोजगारासाठी करावा, असे मनोगत व्यक्त केले. तसेच अमृतचे श्री. शुभम मुळजकर व श्री. चिंतेश जोशी, MCED चे PO श्री. दीपक गायकवाड व श्री. अमोल दिवेकर यांची प्रमुख उपस्थिती होती. उपस्थित मान्यवरांनी प्रशिक्षणार्थींशी संवाद साधत त्यांच्या प्रशिक्षणातील अनुभवांची माहिती घेतली तसेच प्रशिक्षण पूर्ण केल्याबद्दल त्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या. अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण कार्यक्रमामुळे प्रशिक्षणार्थींमध्ये सौरऊर्जा क्षेत्रातील कौशल्यविकासाबरोबरच रोजगार व स्वयंरोजगाराच्या दृष्टीने आत्मविश्वास निर्माण झाला आहे. प्रशिक्षणादरम्यान मिळालेले तांत्रिक ज्ञान आणि व्यावहारिक अनुभव यांचा उपयोग करून प्रशिक्षणार्थींनी भविष्यात सौरऊर्जा क्षेत्रात आपले करिअर घडवावे आणि इतरांसाठीही रोजगाराच्या संधी निर्माण कराव्यात, असा संदेश यावेळी देण्यात आला. कार्यक्रमाच्या शेवटी प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण केलेल्या प्रशिक्षणार्थींना प्रमुख उपस्थितांच्या हस्ते प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले. प्रमाणपत्र मिळाल्यानंतर प्रशिक्षणार्थींनी समाधान व्यक्त करत अमृत महाराष्ट्र व MCED यांच्या माध्यमातून मिळालेल्या प्रशिक्षणामुळे सौरऊर्जा क्षेत्रात पुढे जाण्यासाठी नवी दिशा आणि प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. अमृत सूर्यमित्र प्रशिक्षण कार्यक्रमाचा हा उपक्रम सौरऊर्जा क्षेत्रासाठी कुशल मनुष्यबळ निर्माण करण्यासोबतच युवकांना रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरणार आहे. शुभम मुळजकर जिल्हा व्यवस्थापक , अमृत कार्यालय,लातूर संपर्क क्रमांक- 7391065470 पत्ता -पहिला मजला ,पित्रछया बिल्डिंग, मयुरेश्वर अपार्टमेंट ,सिग्नल कॅम्प, विद्यानगर ,लातूर तालुका, जिल्हा लातूर-413512

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Shubham Mulajkar News publisher name | Date: 23-07-2026 News publication date | Time: 05:51 PM News publication time | Views: 316 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news
Publisher: Shubham Mulajkar News publisher name | Date: 23-07-2026 News publication date | Time: 05:51 PM News publication time | Views: 316 Number of times this news has been viewed | District: Latur Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement