श्रीमंत बाजीराव पेशवे पराक्रम दिनानिमित्त राज्यभर विविध स्पर्धांचे आयोजन; छत्रपती संभाजीनगर येथे पोस्टरचे अनावरण

महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था यांच्या वतीने १८ ऑगस्ट २०२६ रोजी साजऱ्या होणाऱ्या "थोरले बाजीराव पेशवे पराक्रम दिन २०२६" निमित्त राज्यभर आयोजित विविध स्पर्धा व उपक्रमांच्या अधिकृत पोस्टरचे अनावरण छत्रपती संभाजीनगर विभागीय व जिल्हा कार्यालयात करण्यात आले.

श्रीमंत बाजीराव पेशवे पराक्रम दिनानिमित्त राज्यभर विविध स्पर्धांचे आयोजन; छत्रपती संभाजीनगर येथे  पोस्टरचे अनावरण मुख्य फोटो
मुख्य फोटो

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था यांच्या वतीने १८ ऑगस्ट २०२६ रोजी राज्यभर साजऱ्या होणाऱ्या "थोरले बाजीराव पेशवे पराक्रम दिन २०२६" निमित्त आयोजित करण्यात येणाऱ्या विविध स्पर्धा व उपक्रमांच्या अधिकृत पोस्टरचे अनावरण अमृतच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय व जिल्हा कार्यालयात करण्यात आले.

या कार्यक्रमाला अमृतचे राज्यव्यवस्थापक दीपक जोशी उपस्थित होते. तसेच पर्यटन क्षेत्रातील मिथिलेश कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, विजय तापी, मुकुंद कुलकर्णी, छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे, जालना जिल्हा व्यवस्थापक नितीन खेकाळे, अमृत सखी मंजू कुलकर्णी, रूचा शर्मा तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

यावर्षी "अपराजित योद्धा" थोरले बाजीराव पेशवे यांच्या शौर्य, पराक्रम आणि राष्ट्रनिष्ठेची प्रेरणा समाजापर्यंत पोहोचावी, या उद्देशाने राज्यभर निबंध, वक्तृत्व, काव्यलेखन, रील निर्मिती आणि नाट्यसंहिता लेखन अशा विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 23-07-2026 News publication date | Time: 04:42 PM News publication time | Views: 65 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 23-07-2026 News publication date | Time: 04:42 PM News publication time | Views: 65 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement