ब्लॉक लेव्हल बँकर्स कमिटी (BLBC) बैठकीत अमृत संस्थेच्या विविध योजना, उद्योजकता विकास उपक्रम आणि लक्षित गटातील लाभार्थ्यांना बँकिंग सहकार्य अधिक प्रभावीपणे उपलब्ध करून देण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.
आज आयोजित ब्लॉक लेव्हल बँकर्स कमिटी (BLBC) बैठकीमध्ये महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या विविध योजना, उद्योजकता विकास उपक्रम तसेच लक्षित गटातील लाभार्थ्यांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली.
बैठकीमध्ये अमृतच्या लाभार्थ्यांना बँकांकडून कर्ज, आर्थिक मार्गदर्शन, शासकीय योजनांची जोड, तसेच उद्योग-व्यवसाय उभारणीसाठी आवश्यक असलेले सहकार्य अधिक प्रभावीपणे कसे उपलब्ध करून देता येईल, याबाबत सकारात्मक आणि ठोस भूमिका मांडण्यात आली.
उपस्थित सर्व बँक प्रतिनिधींनी अमृतच्या माध्यमातून येणाऱ्या पात्र लाभार्थ्यांना बँकिंग प्रक्रियेत आवश्यक ते मार्गदर्शन, कर्ज प्रस्तावांची सकारात्मक दखल आणि शक्य ते सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. लाभार्थ्यांना स्वावलंबी बनविण्यासाठी बँका आणि अमृत संस्था यांच्यात समन्वयाने काम करण्यावर सर्वांनी भर दिला.
बैठकीत अमृतच्या योजनांचा अधिकाधिक लाभ पात्र युवक, महिला, शेतकरी, उद्योजक आणि इतर लक्षित गटांपर्यंत पोहोचविण्यासाठी परस्पर समन्वय वाढविण्याचा निर्णय घेण्यात आला. या सकारात्मक चर्चेमुळे अमृतच्या लाभार्थ्यांना भविष्यात अधिक प्रभावी बँकिंग सहाय्य मिळण्याचा मार्ग सुकर होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment