अमृतच्या वतीने लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी; मान्यवरांकडून अभिवादन

महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था यांच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय व जिल्हा कार्यालयात लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती अभिवादन कार्यक्रमाने साजरी करण्यात आली.

अमृतच्या वतीने लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी; मान्यवरांकडून अभिवादन मुख्य फोटो
अमृतच्या वतीने लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी; मान्यवरांकडून अभिवादन अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था यांच्या छत्रपती संभाजीनगर विभागीय व जिल्हा कार्यालयात आज लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांची जयंती साजरी करण्यात आली.

यावेळी लोकमान्य टिळक यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. उपस्थित मान्यवरांनी टिळकांच्या विचारांना उजाळा देत त्यांच्या कार्याची आठवण करून दिली. समाजासाठी आणि देशासाठी त्यांनी केलेले काम आजही सर्वांसाठी प्रेरणादायी असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

या कार्यक्रमाला अमृतचे राज्यव्यवस्थापक दीपक जोशी उपस्थित होते. तसेच पर्यटन क्षेत्रातील मिथिलेश कुलकर्णी, गिरीश कुलकर्णी, विजय तापी, मुकुंद कुलकर्णी, छत्रपती संभाजीनगर जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे, जालना जिल्हा व्यवस्थापक नितीन खेकाळे, अमृत सखी मंजू कुलकर्णी, रूचा शर्मा तसेच इतर मान्यवर उपस्थित होते.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 23-07-2026 News publication date | Time: 03:42 PM News publication time | Views: 95 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 23-07-2026 News publication date | Time: 03:42 PM News publication time | Views: 95 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement