: अमृतच्या उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आयोजित तिसऱ्या सत्रात बँक कर्ज व कर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांबाबत उद्योजकांना सखोल मार्गदर्शन

अमृतच्या उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आयोजित तिसऱ्या सत्रात "बँक कर्ज व कर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे" या विषयावर वैश्य नागरी सहकारी बँकेचे बँक अधिकारी विश्वास जोशी यांनी प्रशिक्षणार्थींना सविस्तर मार्गदर्शन केले.

 : अमृतच्या उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आयोजित तिसऱ्या सत्रात बँक कर्ज व कर्जासाठी लागणारी आवश्यक  कागदपत्रांबाबत उद्योजकांना सखोल मार्गदर्शन मुख्य फोटो
 : अमृतच्या उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आयोजित तिसऱ्या सत्रात बँक कर्ज व कर्जासाठी लागणारी आवश्यक  कागदपत्रांबाबत उद्योजकांना सखोल मार्गदर्शन अतिरिक्त फोटो

परभणी : अमृतच्या उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत आयोजित तिसऱ्या सत्रात "बँक कर्ज व कर्जासाठी लागणारी आवश्यक कागदपत्रे" या विषयावर वैश्य नागरी सहकारी बँकेचे बँक अधिकारी विश्वास जोशी यांनी प्रशिक्षणार्थींना सविस्तर मार्गदर्शन केले.

यावेळी त्यांनी उद्योग सुरू करण्यासाठी विविध बँक कर्ज योजनांची माहिती, कर्ज मंजुरीची प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे, प्रकल्प अहवालाचे महत्त्व, आर्थिक शिस्त, कर्ज परतफेडीचे नियोजन तसेच उद्योजकांनी बँकेशी व्यवहार करताना घ्यावयाची काळजी याविषयी सखोल माहिती दिली. योग्य नियोजन, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता आणि विश्वासार्ह आर्थिक व्यवहार यांच्या आधारे उद्योगासाठी कर्ज मिळविणे अधिक सुलभ होऊ शकते, असे त्यांनी सांगितले.

प्रशिक्षणार्थींनी या सत्रात उत्स्फूर्त सहभाग घेत विविध शंकांचे निरसन करून घेतले. बँक कर्ज प्रक्रियेची प्रत्यक्ष व उपयुक्त माहिती मिळाल्याने उद्योग उभारणीसाठी आवश्यक आर्थिक बाबींची स्पष्ट समज प्रशिक्षणार्थींना झाली. हे सत्र उद्योजकांसाठी अत्यंत मार्गदर्शक व उपयुक्त ठरले. या वेळी अमृतचे संस्थेचे व्यवस्थापक अनिरुद्ध काटे, उपव्यवस्थापक रवी कुलकर्णी, अमृत मित्र अनंत जोगदंड, अमृत सखी मयुरी टेळकीकर व प्रशिक्षणार्थीं उपस्थित होते.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/



Publisher: Anirudha Kate News publisher name | Date: 23-07-2026 News publication date | Time: 02:20 PM News publication time | Views: 40 Number of times this news has been viewed | District: Parbhani Related district of the news
Publisher: Anirudha Kate News publisher name | Date: 23-07-2026 News publication date | Time: 02:20 PM News publication time | Views: 40 Number of times this news has been viewed | District: Parbhani Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement