हिंगोली जिल्ह्याच्या वतीने श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या जयंतीनिमित्त अमृत संस्थेमार्फत आयोजित करण्यात येणाऱ्या ‘पराक्रम दिन’ उपक्रमाच्या पोस्टरचे अनावरण मा. गटविकास अधिकारी, पंचायत समिती वसमत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी त्यांनी उपक्रमाचे कौतुक करून तो यशस्वी करण्यासाठी आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
हिंगोली जिल्ह्याच्या वतीने श्रीमंत बाजीराव पेशवे यांच्या जयंतीचे औचित्य साधून महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) यांच्या माध्यमातून आयोजित करण्यात येणाऱ्या ‘पराक्रम दिन’ उपक्रमाच्या पोस्टरचे अनावरण मा. गटविकास अधिकारी, पंचायत समिती वसमत यांच्या शुभहस्ते करण्यात आले.
यावेळी ‘पराक्रम दिन’ उपक्रमाची संकल्पना, उद्दिष्टे आणि युवकांमध्ये राष्ट्रप्रेम, शौर्य, नेतृत्वगुण व प्रेरणादायी इतिहासाची जाणीव निर्माण करण्याच्या दृष्टीने अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली.
पोस्टरचे अनावरण करताना मा. गटविकास अधिकारी यांनी अमृत संस्थेच्या सामाजिक व जनजागृतीपर उपक्रमांचे कौतुक केले. तसेच ‘पराक्रम दिन’ उपक्रम यशस्वी करण्यासाठी पंचायत समितीच्या वतीने आवश्यक ते सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
अमृत संस्था हिंगोली जिल्ह्याच्या वतीने युवक, महिला व नागरिकांमध्ये राष्ट्रभक्ती, नेतृत्व आणि सामाजिक उत्तरदायित्वाची भावना दृढ करण्यासाठी विविध उपक्रम सातत्याने राबवत असून, ‘पराक्रम दिन’ हा त्याच मालिकेतील एक महत्त्वपूर्ण उपक्रम ठरणार आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment