बीडमध्ये लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी- अमृत संस्थेचा सहभाग

भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेते, राष्ट्रवादी विचारवंत तथा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त बीड शहरात त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. वीर सावरकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

बीडमध्ये लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी- अमृत संस्थेचा सहभाग  मुख्य फोटो
बीडमध्ये लोकमान्य टिळक जयंती उत्साहात साजरी- अमृत संस्थेचा सहभाग  अतिरिक्त फोटो

बीड : भारतीय स्वातंत्र्य चळवळीतील अग्रणी नेते, राष्ट्रवादी विचारवंत तथा लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त बीड शहरात त्यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. वीर सावरकर सामाजिक प्रतिष्ठानच्या वतीने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

यावेळी लोकमान्य टिळक यांच्या पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून त्यांच्या राष्ट्रकार्याला आणि स्वातंत्र्यलढ्यातील योगदानाला अभिवादन करण्यात आले. टिळकांनी दिलेला राष्ट्रभक्ती, स्वराज्य आणि समाजजागृतीचा विचार आजही प्रेरणादायी असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

कार्यक्रमास शहरातील अनेक मान्यवर व टिळकप्रेमी नागरिक उपस्थित होते. यामध्ये डॉ. अजिंक्य पांडव, प्रा. अभय पटवारी, संजय कुलकर्णी, संजय खांदाट, अमृत संस्थेतर्फे अमृतचे बीड जिल्हा व्यवस्थापक विशाल जोशी, ब्राह्मण महासंघाचे जिल्हाध्यक्ष महेश कुलकर्णी, विघ्नहर्ता मित्र मंडळाचे शुभम जोशी, दिलीप राऊतमारे, संजय चौसाळकर, सतीश देशपांडे, त्र्यंबक देशपांडे, डॉ. मनोज पोहनेरकर, प्रकाश चैतन्य यांच्यासह अनेक टिळकप्रेमी नागरिक उपस्थित होते.

कार्यक्रम शांततेत व उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला. उपस्थितांनी लोकमान्य टिळक यांच्या कार्याला अभिवादन करत त्यांच्या विचारांचा वारसा पुढील पिढीपर्यंत पोहोचविण्याचा संकल्प व्यक्त केला.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 23-07-2026 News publication date | Time: 01:48 PM News publication time | Views: 60 Number of times this news has been viewed | District: Beed Related district of the news
Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 23-07-2026 News publication date | Time: 01:48 PM News publication time | Views: 60 Number of times this news has been viewed | District: Beed Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement