लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त रायझिंग स्टार किड्स स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून अमृत कार्यालयात अभिवादन

रायझिंग स्टार किड्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अमृत विभाग व जिल्हा कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे भेट देऊन लोकमान्य टिळकांना अभिवादन केले. यावेळी मुख्याध्यापिका सौ. पूजा कावरे, अमृत जिल्हा कार्यालयाची टीम उपस्थित होती. विद्यार्थ्यांनी टिळकांच्या कार्याची माहिती जाणून घेत राष्ट्रीय मूल्यांचा प्रेरणादायी संदेश आत्मसात केला.

लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त रायझिंग स्टार किड्स स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून अमृत कार्यालयात अभिवादन मुख्य फोटो
लोकमान्य टिळक जयंतीनिमित्त रायझिंग स्टार किड्स स्कूलच्या विद्यार्थ्यांकडून अमृत कार्यालयात अभिवादन अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर, दि. २३ जुलै २०२६ : लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांच्या जयंतीनिमित्त रायझिंग स्टार किड्स स्कूलच्या विद्यार्थ्यांनी अमृत महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (AMRUT) जिल्हा कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे सदिच्छा भेट देऊन लोकमान्य टिळकांना अभिवादन केले.

यावेळी विद्यार्थ्यांनी लोकमान्य टिळकांच्या प्रतिमेस पुष्प अर्पण करून त्यांच्या राष्ट्रप्रेम, स्वातंत्र्यलढ्यातील योगदान आणि सामाजिक कार्याला आदरांजली वाहिली. चिमुकल्यांच्या उत्साही सहभागामुळे कार्यालय परिसर देशभक्तीच्या वातावरणाने भारावून गेला.

या प्रसंगी शाळेच्या मुख्याध्यापिका सौ. पूजा कावरे उपस्थित होत्या. त्यांनी विद्यार्थ्यांना लोकमान्य टिळकांचे विचार, देशभक्ती, शिक्षणाचे महत्त्व आणि सामाजिक जबाबदारी याविषयी मार्गदर्शन केले.

भेटीदरम्यान विद्यार्थ्यांनी अमृत कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांशी संवाद साधला. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांना महापुरुषांचे विचार जाणून घेण्याबरोबरच सामाजिक जाणीव आणि राष्ट्रीय मूल्यांचे महत्त्व समजण्यास मदत झाली.

यावेळी अमृत जिल्हा कार्यालयाची संपूर्ण टीम उपस्थित होती. सर्वांनी विद्यार्थ्यांचे स्वागत करून त्यांच्या उपक्रमाचे कौतुक केले व उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.



अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/



Publisher: Manju Kulkarni News publisher name | Date: 23-07-2026 News publication date | Time: 01:39 PM News publication time | Views: 64 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Manju Kulkarni News publisher name | Date: 23-07-2026 News publication date | Time: 01:39 PM News publication time | Views: 64 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement