गडहिंग्लज (कोल्हापूर): अमृततर्फे गडहिंग्लज येथे आयोजित करण्यात आलेला दोन दिवसीय अमृत निवासीमेळा यशस्वीरित्या पार पडला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित या निवासी शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.
अमृततर्फे गडहिंग्लज येथे आयोजित करण्यात आलेला दोन दिवसीय अमृत निवासी मेळा उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या पार पडला. विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित या निवासी शिबिराला विद्यार्थ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. हे निवासी शिबिर अमृतमित्र श्री. शिरीष कुलकर्णी यांनी यशस्वीरीत्या १८ व १९ जुलै रोजी आयोजित केले होते.
शिबिरामध्ये मानसिक स्वास्थ्य, एकाग्रता वाढविणारे उपक्रम तसेच विविध मैदानी व बौद्धिक खेळांचे आयोजन करण्यात आले. या उपक्रमांमुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, नेतृत्वगुण, संघभावना आणि सकारात्मक विचारसरणी विकसित होण्यास मदत झाली.
शिबिरांतर्गत शारीरिक तंदुरुस्ती, मानसिक शांतता आणि तणावमुक्त जीवनशैलीचे महत्त्व विद्यार्थ्यांना प्रत्यक्ष अनुभवातून समजावून सांगण्यात आले. प्रशिक्षकांनी योगाचे दैनंदिन जीवनातील फायदे आणि नियमित सरावाचे महत्त्व प्रभावीपणे स्पष्ट केले.
दोन दिवसांच्या या निवासी शिबिरात विद्यार्थ्यांनी विविध उपक्रमांमध्ये सक्रिय सहभाग नोंदवत आनंददायी वातावरणात शिक्षण, संस्कार आणि स्व-विकासाचा अनुभव घेतला. खेळ, संवादात्मक सत्रे आणि प्रेरणादायी मार्गदर्शनामुळे शिबिर विद्यार्थ्यांसाठी संस्मरणीय ठरले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment