गेवराई नगराध्यक्षा सौ.गीताभाभी पवार यांची ‘अमृत’च्या विविध उपक्रमांना सहकार्याची दिली ग्वाही

अमृत संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजना व उपक्रमांची माहिती देण्यासाठी अमृतचे बीड जिल्हा व्यवस्थापक विशाल जोशी यांनी गेवराई नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. गीताभाभी बाळराजे पवार यांची सदिच्छा भेट घेतली.

गेवराई नगराध्यक्षा सौ.गीताभाभी पवार यांची ‘अमृत’च्या विविध उपक्रमांना  सहकार्याची दिली ग्वाही मुख्य फोटो
मुख्य फोटो

गेवराई : महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेच्या माध्यमातून राबविण्यात येणाऱ्या विविध लोककल्याणकारी योजना व उपक्रमांची माहिती देण्यासाठी अमृतचे बीड जिल्हा व्यवस्थापक विशाल जोशी यांनी गेवराई नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा सौ. गीताभाभी बाळराजे पवार यांची सदिच्छा भेट घेतली. यावेळी अमृत संस्थेमार्फत राबविण्यात येणाऱ्या शिक्षण, कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता विकास, शिष्यवृत्ती, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन, ड्रोन प्रशिक्षण, स्वयंरोजगार, अमृत-सक्षम व अमृत मानसमित्र यांसह विविध उपक्रमांची माहिती देण्यात आली. ग्रामीण व निमशहरी भागातील युवक, महिला, विद्यार्थी आणि उद्योजकांना या योजनांचा लाभ मिळवून देण्यासाठी अमृत कार्यरत असल्याची माहिती विशाल जोशी यांनी दिली. नगराध्यक्षा सौ. गीताभाभी पवार यांनी अमृतच्या विविध उपक्रमांविषयी सविस्तर माहिती जाणून घेतली. समाजातील गरजू व पात्र घटकांपर्यंत योजनांचा लाभ पोहोचण्यासाठी अशा उपक्रमांची आवश्यकता असल्याचे सांगत, आवश्यक त्या ठिकाणी गेवराई नगरपरिषदेच्या वतीने सहकार्य करण्याची ग्वाही त्यांनी दिली.

यावेळी गेवराई शहर व परिसरातील अधिकाधिक लाभार्थ्यांना अमृतच्या योजनांशी जोडण्यासाठी समन्वयाने काम करण्याबाबत सकारात्मक चर्चा झाली.

या प्रसंगी अमृतचे बीड जिल्हा व्यवस्थापक विशाल जोशी तसेच अमृत मित्र सुमित धिरडे उपस्थित होते. अधिक माहितीसाठी संपर्क : 73910 65468 पत्ता : अमृत संस्थेचे बीड जिल्हा कार्यालय, अथर्व अभ्यासिकेच्या वर, नवगण कॉलेज रोड, वाघ नेत्रालयाशेजारी, बीड. 431122 अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/




Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 22-07-2026 News publication date | Time: 05:51 PM News publication time | Views: 97 Number of times this news has been viewed | District: Beed Related district of the news
Publisher: Vishal Joshi News publisher name | Date: 22-07-2026 News publication date | Time: 05:51 PM News publication time | Views: 97 Number of times this news has been viewed | District: Beed Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement