कर्जत तालुकास्तरीय अमृत संवाद मेळाव्याचे लवकरच आयोजन

अहिल्यानगरच्या कर्जत तालुका ब्राह्मण संघटनेचे अध्यक्ष प्रसाद ढोकरीकर यांचे साह्याचे आश्वासन

कर्जत तालुकास्तरीय अमृत संवाद मेळाव्याचे लवकरच आयोजन मुख्य फोटो
मुख्य फोटो

अहिल्यानगर : अमृत संस्थेचे अहिल्यानगर जिल्हा उपव्यवस्थापक वैभव कुलकर्णी यांनी कर्जत तालुका ब्राह्मण संघटनेचे अध्यक्ष तथा नगरसेवक प्रसाद ढोकरीकर यांची कर्जत येथील त्यांच्या कार्यालयात भेट घेतली. यावेळी त्यांना अमृत संस्था आणि संस्थेच्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली. अमृत संस्थेच्या कार्याची त्यांनी प्रशंसा केली. संस्थेच्या योजनांची माहिती ग्रामीण भागातील लक्ष्यित गटातील गरजूंपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी सहकार्य करण्याचे आश्वासन त्यांनी या वेळी दिले. अमृत संस्थेच्या योजनांची माहिती लक्ष्यित गटातील सर्वांपर्यंत पोहचवण्यासाठी लवकरच भव्य तालुकास्तरीय अमृत संवाद मेळावा आयोजित करण्याचे आश्वासन त्यांनी दिले. तसेच अमृत संस्थेचे व्यवस्थापकीय संचालक विजय जोशी यांची भेट घेण्याची इच्छाही त्यांनी व्यक्त केली.

अमृत संस्थेविषयी :
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना दुसऱ्या कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळे यांच्या योजनांचा लाभ मिळत नाही, अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, ठाकूर, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात.

अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.

पत्ता : अमृत कार्यालय, वरुण अपार्टमेंट,
आकाशवाणी केंद्रासमोर, सावेडी,
अहिल्यानगर-414003
संपर्क : 9112228769

संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in

Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 26-12-2025 News publication date | Time: 02:28 PM News publication time | Views: 445 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 26-12-2025 News publication date | Time: 02:28 PM News publication time | Views: 445 Number of times this news has been viewed | District: ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words