सेल्स स्किल, नेटवर्किंग आणि मार्केटिंग विषयावर चंद्रशेखर अलनुरे यांचे मार्गदर्शन

परभणी येथे अमृतच्या उद्योजकता विकास प्रशिक्षण अंतर्गत आज आयोजित दुसऱ्या सत्रात सेल्स स्किल , नेटवर्किंग आणि मार्केटिंग या महत्त्वपूर्ण विषयांवर उद्योजक मार्गदर्शक चंद्रशेखर अलनुरे यांनी सखोल मार्गदर्शन केले.

सेल्स स्किल, नेटवर्किंग आणि मार्केटिंग विषयावर चंद्रशेखर अलनुरे यांचे मार्गदर्शन मुख्य फोटो
सेल्स स्किल, नेटवर्किंग आणि मार्केटिंग विषयावर चंद्रशेखर अलनुरे यांचे मार्गदर्शन अतिरिक्त फोटो

परभणी येथे अमृतच्या उद्योजकता विकास प्रशिक्षण अंतर्गत आज आयोजित दुसऱ्या सत्रात सेल्स स्किल , नेटवर्किंग आणि मार्केटिंग या महत्त्वपूर्ण विषयांवर उद्योजक मार्गदर्शक चंद्रशेखर अलनुरे यांनी सखोल मार्गदर्शन केले.

यावेळी त्यांनी कोणत्याही व्यवसायाच्या यशामध्ये प्रभावी विक्री कौशल्य, मजबूत व्यावसायिक नेटवर्क आणि योग्य मार्केटिंग धोरण यांचे महत्त्व स्पष्ट केले. ग्राहकांच्या गरजा ओळखून त्यानुसार उत्पादने व सेवा सादर करणे, विश्वासार्ह ग्राहक संबंध निर्माण करणे, डिजिटल माध्यमांचा प्रभावी वापर करणे तसेच स्वतःच्या ब्रँडची ओळख निर्माण करण्यासाठी आवश्यक असलेल्या विविध बाबींवर त्यांनी प्रशिक्षणार्थींना मार्गदर्शन केले.

उद्योजकांनी सातत्याने नवीन ग्राहकांशी संपर्क वाढवून व्यावसायिक नेटवर्क मजबूत करावे, बाजारातील बदलांचा अभ्यास करून त्यानुसार मार्केटिंगमध्ये नाविन्य आणावे आणि उत्कृष्ट ग्राहकसेवेच्या माध्यमातून व्यवसायाची विश्वासार्हता वाढवावी, असे आवाहन त्यांनी केले.

प्रशिक्षणार्थींनी या मार्गदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत विविध शंकांचे निरसन करून व्यवसाय वृद्धीसाठी उपयुक्त माहिती आत्मसात केली. यानंतर प्रश्न उत्तराचे सत्र संपन्न झाले. या वेळी परभणी येथील अमृत संस्थेचे जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे, उपव्यवस्थापक रवी कुलकर्णी, अमृत सखी मयूरी टेळकीकर उपस्थित होते.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Anirudha Kate News publisher name | Date: 22-07-2026 News publication date | Time: 03:34 PM News publication time | Views: 97 Number of times this news has been viewed | District: Parbhani Related district of the news
Publisher: Anirudha Kate News publisher name | Date: 22-07-2026 News publication date | Time: 03:34 PM News publication time | Views: 97 Number of times this news has been viewed | District: Parbhani Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement