जळगाव जिल्ह्यात अमृत - सक्षम द्वारा होणार घन कचऱ्याचे होणार व्यवस्थापन

महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी द्वारा व कुशाग्र इनोवेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यामाने अमृत सक्षम हा विशेष उद्योजकता विकास कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येणार त्या अनुषंगाने जळगाव जिल्ह्यातही लोकजागृती होणार आहे.

जळगाव जिल्ह्यात अमृत - सक्षम द्वारा होणार घन कचऱ्याचे  होणार  व्यवस्थापन मुख्य फोटो
मुख्य फोटो

महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी 'अमृत' ही महाराष्ट्र शासनाची स्वास्थ्य संस्था असून राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील अशा जाती, ज्यांना इतर कोणत्याही शासकीय विभाग, संस्था किंवा महामंडळांमार्फत योजनांचा लाभ उपलब्ध होत नाही, यांच्या सर्वांगीण सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात. अमृतच्या उद्दिष्टांच्या पूर्ततेसाठी महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांतील अमृत जिल्हा कार्यालयातील जिल्हा व्यवस्थापक आणि टीम सक्रिय काम करीत आहेत. या अंतर्गत कौशल्य विकास, प्रशिक्षण, उद्योजकता विकास, रोजगार विमुख प्रशिक्षण, स्वयंरोजगार प्रोत्साहन, तंत्रज्ञान व ज्ञानावर आधारित प्रशिक्षण आणि बाजारपेठ उपलब्ध करून देणे, तसेच आर्थिक सक्षमीकरणासाठी योजना व कार्यक्रम प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. अमृत संस्थेच्या या उद्दिष्टांच्या अनुषंगाने, घनकचरा व्यवस्थापन क्षेत्रात स्थानिक युवक-युवतींना कौशल्यावर आधारित स्वयंरोजगार व उद्योजकतेच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने, अमृत या महाराष्ट्र शासनाच्या संस्थेद्वारे आणि कुशाग्र इनोवेशन फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने 'अमृत सक्षम' हा विशेष उद्योजकता विकास कार्यक्रम संपूर्ण महाराष्ट्रात राबवण्यात येत आहे. या अंतर्गत आमच्या जळगाव जिल्ह्यातील १५ तालुके व एक महानगरपालिका या सर्व ठिकाणी प्रमुख व्यक्तींना भेटून टीमद्वारे वरील कार्यक्रमाची रचना सांगितली असून, त्यानुसार सर्व अधिकाऱ्यांनी सकारात्मक दृष्टिकोन दाखवला आहे.


जळगावच्या निवासी जिल्हाधिकारी श्रीमती वैशाली चव्हाण, महानगरपालिकेचे आयुक्त श्री. आदित्य जीवने आणि जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी या प्रमुख व्यक्तींनी वरील कार्यक्रमाविषयी सकारात्मकता दाखवून कार्यक्रमासाठी शुभेच्छा दिल्या आहेत.



अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/



Publisher: Rajendra Kanade News publisher name | Date: 22-07-2026 News publication date | Time: 01:11 PM News publication time | Views: 157 Number of times this news has been viewed | District: Jalgaon Related district of the news
Publisher: Rajendra Kanade News publisher name | Date: 22-07-2026 News publication date | Time: 01:11 PM News publication time | Views: 157 Number of times this news has been viewed | District: Jalgaon Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement