तळेगाव ढमढेरे येथे अमृतच्या विविध योजनांची माहिती; विद्यार्थ्यांना लाभ देण्याबाबत सकारात्मक चर्चा

तळेगाव ढमढेरे (प्रतिनिधी): तळेगाव ढमढेरे येथील श्री साहेबराव ढमढेरे महाविद्यालयात अमृत मित्र कमलाकर कुलकर्णी यांनी महाविद्यालयाचे उप प्राचार्य डॉ. पराग चौधरी यांची सदिच्छा भेट घेऊन अमृतच्या विविध योजना, कौशल्य विकास उपक्रम तसेच विद्यार्थी-केंद्रित कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली.

तळेगाव ढमढेरे येथे अमृतच्या विविध योजनांची माहिती; विद्यार्थ्यांना लाभ देण्याबाबत सकारात्मक चर्चा मुख्य फोटो
मुख्य फोटो

तळेगाव ढमढेरे (प्रतिनिधी): तळेगाव ढमढेरे येथील श्री साहेबराव ढमढेरे महाविद्यालयात अमृतचे मित्र कमलाकर कुलकर्णी यांनी महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉ. पराग चौधरी यांची सदिच्छा भेट घेऊन अमृतच्या विविध योजना, कौशल्य विकास उपक्रम तसेच विद्यार्थी-केंद्रित कार्यक्रमांची सविस्तर माहिती दिली.


यावेळी विद्यार्थ्यांनी अमृतच्या योजनांचा जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले. उपप्राचार्य डॉ. पराग चौधरी यांनी अमृतच्या उपक्रमांचे स्वागत करत महाविद्यालयातील विविध विभागांतील विद्यार्थ्यांना या योजनांचा लाभ कशा प्रकारे मिळवून देता येईल, याबाबत सकारात्मक चर्चा केली.


विशेषतः महाविद्यालयातील बीसीएस (कॉम्प्युटर सायन्स) विभागातील विद्यार्थ्यांना कौशल्य विकास, प्रशिक्षण व इतर योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने सविस्तर माहिती घेण्यात आली. तसेच अमृत वर्गाच्या संदर्भात कनिष्ठ महाविद्यालयाचे प्राचार्य श्री. दहिफळे यांचीही भेट घेऊन पुढील सहकार्याबाबत चर्चा करण्यात आली.


या भेटीद्वारे अमृतच्या विविध योजनांचा अधिकाधिक विद्यार्थ्यांपर्यंत लाभ पोहोचविण्यासाठी महाविद्यालय प्रशासन व अमृत यांच्यात समन्वयाने काम करण्याबाबत सकारात्मक वातावरण निर्माण झाले.


अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/


Publisher: कमलाकर कुलकर्णी News publisher name | Date: 21-07-2026 News publication date | Time: 10:20 PM News publication time | Views: 37 Number of times this news has been viewed | District: Pune Related district of the news
Publisher: कमलाकर कुलकर्णी News publisher name | Date: 21-07-2026 News publication date | Time: 10:20 PM News publication time | Views: 37 Number of times this news has been viewed | District: Pune Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement