महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था अमृत यांच्या वतीने आयोजित 'अमृत अन्नपूर्णा' प्रशिक्षण कार्यक्रमाचा शुभारंभ माननीय श्रीराम बेंडे यांच्या हस्ते झाला. कार्यक्रमात फूड लायसन्स (FSSAI), क्लाऊड किचन व्यवसाय, डिजिटल मार्केटिंग, ब्रँडिंग आणि ऑनलाइन फूड डिलिव्हरी प्लॅटफॉर्मच्या वापराबाबत तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्था अमृत यांच्या वतीने आयोजित "अमृत अन्नपूर्णा" प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन माननीय श्री. श्रीराम बेंडे यांच्या हस्ते उत्साहपूर्ण वातावरणात संपन्न झाले. उद्योजकतेला चालना देण्याच्या उद्देशाने आयोजित या प्रशिक्षणात क्लाऊड किचन व्यवसाय, फूड लायसन्स, डिजिटल प्लॅटफॉर्मचा वापर आणि व्यवसाय व्यवस्थापन यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर तज्ज्ञांनी मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या उद्घाटनप्रसंगी श्री. श्रीराम बेंडे यांनी आजच्या बदलत्या काळात स्वयंरोजगार आणि कौशल्याधारित उद्योगांची गरज अधोरेखित केली. महिलांनी व युवकांनी शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेत स्वतःचा उद्योग उभारावा, असे आवाहन त्यांनी केले.
यानंतर रूपा कानविंदे यांनी फूड सेफ्टी अँड स्टँडर्ड्स अथॉरिटी ऑफ इंडिया (FSSAI) अंतर्गत फूड लायसन्सचे महत्त्व, अर्ज प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रे तसेच अन्न व्यवसायासाठी आवश्यक असलेल्या कायदेशीर बाबींवर सखोल मार्गदर्शन केले. उद्योग सुरू करताना नियमांचे पालन केल्यास व्यवसाय अधिक विश्वासार्ह आणि यशस्वी ठरतो, असे त्यांनी सांगितले.
प्रशिक्षणाच्या पुढील सत्रात अभिषेक खंडाळकर यांनी क्लाऊड किचन व्यवसायाची संकल्पना, कमी भांडवलात व्यवसाय उभारण्याच्या संधी, ऑनलाइन फूड डिलिव्हरी ॲपचा प्रभावी वापर, ब्रँडिंग, डिजिटल मार्केटिंग आणि ग्राहक सेवा याविषयी सविस्तर माहिती दिली. प्रशिक्षणार्थींनी विचारलेल्या विविध प्रश्नांना त्यांनी समर्पक उत्तरे देत व्यवसायातील प्रत्यक्ष अनुभवही मांडले.
कार्यक्रमात मोठ्या संख्येने प्रशिक्षणार्थींनी सहभाग नोंदवत मार्गदर्शनाचा लाभ घेतला. उद्योजकतेसाठी आवश्यक कौशल्ये विकसित करण्यास आणि महिलांसह युवकांना आत्मनिर्भरतेकडे वाटचाल करण्यास हा प्रशिक्षण उपक्रम निश्चितच उपयुक्त ठरेल, असा विश्वास उपस्थितांनी व्यक्त केला.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment