छत्रपती संभाजीनगरात अमृत उद्यम प्रशिक्षणाला सुरुवात

महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृत यांच्या वतीने छत्रपती संभाजीनगर येथे अमृत उद्यम लघु प्रशिक्षण (EDP) कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. या प्रशिक्षणात उद्योग निवड, व्यवसाय नियोजन, आर्थिक व्यवस्थापन, शासकीय योजनांचा लाभ, विपणन कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि स्वयंरोजगाराच्या संधी याविषयी मार्गदर्शन दिले जाणार आहे.

छत्रपती संभाजीनगरात अमृत उद्यम प्रशिक्षणाला सुरुवात मुख्य फोटो
छत्रपती संभाजीनगरात अमृत उद्यम प्रशिक्षणाला सुरुवात अतिरिक्त फोटो

छत्रपती संभाजीनगर : महाराष्ट्र शासनाची स्वायत्त संस्था अमृत यांच्या वतीने उद्योजक घडविण्याच्या उद्देशाने अमृत उद्यम लघु प्रशिक्षण (EDP) कार्यक्रमाचा शुभारंभ सोमवारी (दि. २१ जुलै) अमृतच्या छत्रपती संभाजीनगर जिल्हा कार्यालयात झाला. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी डॉ. दिवाकरराव कुलकर्णी होते. त्यांनी उपस्थित लाभार्थ्यांना मार्गदर्शन करताना, "नोकरीच्या संधी शोधण्यापेक्षा स्वतःचा उद्योग-व्यवसाय उभारणे ही काळाची गरज आहे. व्यवसायात सातत्य, सचोटी, प्रामाणिकपणा आणि विश्वासार्हता जपल्यास यश निश्चित मिळते. व्यवसायातील मेहनत आणि सातत्य अधिक महत्त्वाचे आहे," असे सांगितले. अमृतच्या या प्रशिक्षणामध्ये उद्योग निवड, व्यवसाय नियोजन, आर्थिक व्यवस्थापन, शासकीय योजनांचा लाभ, विपणन कौशल्य, व्यक्तिमत्त्व विकास आणि स्वयंरोजगाराच्या संधी याविषयी मार्गदर्शन करण्यात येणार आहे. "नोकरी मागणारे नव्हे, तर नोकरी देणारे उद्योजक घडविणे" हा या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश असल्याचे सांगण्यात आले. या उपक्रमाचे आयोजन अमृतचे राज्य व्यवस्थापक दीपक जोशी, विभागीय व्यवस्थापक अमित सामंत आणि विभागीय उपव्यवस्थापक ओंकार शेटे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आले. यावेळी जिल्हा व्यवस्थापक अक्षय लंबे, जिल्हा उपव्यवस्थापक योगेश रोडे, अमृत मित्र रामेश्वर साळुंखे, अमृत सखी मंजू कुलकर्णी, अमृत सखी रुचा शर्मा, तसेच लाभार्थी उपस्थित होते. उद्योग कसा निवडावा या विषयावर आदित्य धाराशिवकर यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाच्या प्रारंभी मान्यवरांचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला. जिल्हा अमृत टीमने कार्यक्रमाचे नियोजन केले. अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 21-07-2026 News publication date | Time: 05:55 PM News publication time | Views: 267 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news
Publisher: Akshay lambe News publisher name | Date: 21-07-2026 News publication date | Time: 05:55 PM News publication time | Views: 267 Number of times this news has been viewed | District: Chhatrapati_Sambhajinagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement