जामखेड (जिल्हा- अहिल्यानगर) तालुका तहसीलदार यांची भेट

अहिल्यानगर येथील जामखेड तालुका निवासी नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी श्री. मच्छिंद्र सदाशिव पाडळे यांची भेट, लवकरच अमृत संवाद सेतू उपक्रमाचे आयोजन.

 जामखेड (जिल्हा- अहिल्यानगर) तालुका तहसीलदार यांची भेट मुख्य फोटो
मुख्य फोटो

अहिल्यानगर येथील जामखेड तालुका निवासी नायब तहसीलदार तथा कार्यकारी दंडाधिकारी श्री. मच्छिंद्र सदाशिव पाडळे यांची अमृत मित्र वैभव कुलकर्णी यांनी आज भेट घेतली.अमृत संस्थेच्या विविध योजना तसेच जामखेड तालुका येथे अमृत च्या लक्षित गटातील समाज हितासाठी अमृत संस्थेचे चालू असलेले कार्य याविषयी सविस्तर माहिती दिली. अमृत संवाद सेतू उपक्रम संदर्भात माहिती दिली असता तेथे अमृत संवाद सेतू उपक्रम लवकरच राबवण्यात यावा यासाठी सर्व सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले .

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, सिंधी,कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी,जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार इत्यादी जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व 36 जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत. संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/ अमृत जिल्हा कार्यालय संपर्क क्रमांक :- 9112228769 जिल्हा कार्यालय पत्ता : वरुण अपार्टमेंट, आकाशवाणी केंद्र समोर,प्रोफेसर चौक, सावेडी, अहिल्यानगर - 414003

Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 21-07-2026 News publication date | Time: 04:00 PM News publication time | Views: 63 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news
Publisher: Sagar Bhope News publisher name | Date: 21-07-2026 News publication date | Time: 04:00 PM News publication time | Views: 63 Number of times this news has been viewed | District: Ahilyanagar Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement