तीन दिवसीय उद्योजकता विकास (EDP) प्रशिक्षण कार्यक्रमाचा डोंबिवली येथे उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन अमृतचे कोकण विभागीय व्यवस्थापक मा. मंगेशजी खाडीलकर सर यांच्या हस्ते झाले.
तीन दिवसीय उद्योजकता विकास (EDP) प्रशिक्षण कार्यक्रमाचा डोंबिवली येथे उत्साहपूर्ण वातावरणात शुभारंभ करण्यात आला. कार्यक्रमाचे उद्घाटन अमृतचे कोकण विभागीय व्यवस्थापक मा. मंगेशजी खाडीलकर सर यांच्या हस्ते झाले. यावेळी त्यांनी उपस्थित लाभार्थ्यांना अमृत योजनांचे मोलाचे मार्गदर्शन केले.
कार्यक्रमाच्या सुरवातीला सर्व लाभार्थ्यांचे पुष्प देऊन स्वागत करण्यात आले. त्यानंतर प्रशिक्षक अमरजी इखे सर यांनी टप्पा मानसिकता आणि पाया – व्यवसायाचे नेतृत्व करण्यासाठी आवश्यक असलेली आंतरिक जिद्द या विषयावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी डोंबिवली नागरिक सहकारी बँकेच्या प्राची महामूनकर (बिझनेस डेव्हलपमेंट हेड)उपस्थित होत्या.
प्रशिक्षणादरम्यान सर्व लाभार्थ्यांना रायटिंग पॅड, पेन व प्रशिक्षणासाठी आवश्यक नोट्सचे वितरण करण्यात आले.
या प्रशिक्षणामध्ये व्यवसायाची संकल्पना, व्यवसाय आराखडा (Business Plan), आर्थिक नियोजन, भांडवल उभारणी, उद्योग नोंदणी, शासकीय योजना, बँक कर्ज प्रक्रिया, डिजिटल मार्केटिंग, ब्रँडिंग, ग्राहक व्यवस्थापन तसेच उद्योग उभारणीसाठी आवश्यक विविध बाबींवर तज्ज्ञांकडून सखोल मार्गदर्शन करण्यात येणार आहे सहभागी प्रशिक्षणार्थींना उद्योग सुरू करताना येणाऱ्या अडचणी, त्यांवरील उपाय आणि व्यवसाय वृद्धीसाठी आवश्यक कौशल्ये यांचीही माहिती दिली जाणार आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment