परभणी मध्ये अमृतच्या EDP प्रशिक्षणाला उत्साहात प्रारंभ


अमृत संस्थेच्या जिल्हा कार्यालयात २१ जुलै रोजी उद्योजकता विकास कार्यक्रम (EDP) प्रशिक्षणाचा शुभारंभ झाला. प्रशिक्षणात उद्योजकीय मानसिकता, व्यवसायाच्या संधी, नियोजन, नेतृत्वगुण आणि स्वावलंबन याविषयी मार्गदर्शन करण्यात आले.

परभणी मध्ये अमृतच्या EDP प्रशिक्षणाला उत्साहात प्रारंभ मुख्य फोटो
परभणी मध्ये अमृतच्या EDP प्रशिक्षणाला उत्साहात प्रारंभ अतिरिक्त फोटो

परभणीत अमृतच्या उद्योजकता विकास प्रशिक्षणाला सुरुवात.

परभणी : अमृत संस्थेच्या परभणी जिल्हा कार्यालयात उद्योजकता विकास कार्यक्रम (EDP) प्रशिक्षणाचा शुभारंभ २१ जुलै रोजी उत्साहपूर्ण वातावरणात झाला.

प्रशिक्षणाच्या पहिल्या सत्रात प्रशिक्षकांनी उद्योजकीय मानसिकता, व्यवसायाच्या संधी ओळखणे, नियोजन, जोखीम स्वीकारण्याची तयारी, नेतृत्वगुण आणि आव्हानांना सकारात्मक पद्धतीने सामोरे जाण्याबाबत मार्गदर्शन केले.

उद्योजक व प्रशिक्षक चंद्रशेखर अळनुरे यांनी सांगितले की, यशस्वी उद्योजक होण्यासाठी केवळ भांडवल पुरेसे नसते. त्यासाठी दूरदृष्टी, योग्य नियोजन, नेतृत्वगुण, आत्मविश्वास आणि सातत्यपूर्ण प्रयत्न आवश्यक असतात. बदलत्या बाजारपेठेतील संधी ओळखून त्याचे व्यवसायात रूपांतर करण्याची क्षमता प्रत्येकाने विकसित करावी, असे त्यांनी सांगितले.

या प्रशिक्षणामुळे सहभागी युवक-युवतींमध्ये उद्योजकतेबाबत सकारात्मक दृष्टीकोन निर्माण होऊन भविष्यात स्वतःचा उद्योग उभारण्यासाठी त्यांना मार्गदर्शन मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.

यावेळी अमृत संस्थेचे विभागीय उपव्यवस्थापक ओंकार शेटे, परभणी जिल्हा व्यवस्थापक अनिरुद्ध काटे, उपव्यवस्थापक रवी कुलकर्णी, अमृत सखी मयुरी टेळकीकर तसेच अनंत जोगदंड उपस्थित होते. मान्यवरांनी प्रशिक्षणार्थींना उद्योग क्षेत्रातील संधींचा लाभ घेऊन स्वावलंबी होण्याचे आवाहन केले. प्रशिक्षणार्थींनीही विविध विषयांवर प्रश्न विचारून मार्गदर्शनाचा लाभ घेतला.

अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा  जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.


संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/

Publisher: Anirudha Kate News publisher name | Date: 21-07-2026 News publication date | Time: 03:42 PM News publication time | Views: 95 Number of times this news has been viewed | District: Parbhani Related district of the news
Publisher: Anirudha Kate News publisher name | Date: 21-07-2026 News publication date | Time: 03:42 PM News publication time | Views: 95 Number of times this news has been viewed | District: Parbhani Related district of the news

ही बातमी शेअर करा

Comments 0 Comments

No comments yet

You can start the discussion

Write a Comment
0 / 50 words
Advertisement