महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण (अमृत) अंतर्गत वैयक्तिक कर्ज व्याज परतावा (ऑनलाइन क्लेम इंटरेस्ट) योजनेचा लाभ घेण्यासाठी सर्व पात्र लाभार्थ्यांनी वेळेत ऑनलाइन क्लेम इंटरेस्ट अर्ज सादर करून योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण (अमृत) अंतर्गत राबविण्यात येणाऱ्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा (ऑनलाइन क्लेम इंटरेस्ट) योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी मनोज जोशी यांनी अमृत जिल्हा कार्यालय, हिंगोली येथे भेट देऊन ऑनलाइन क्लेम इंटरेस्ट अर्जाची प्रक्रिया पूर्ण केली.
यावेळी अमृत जिल्हा कार्यालयामार्फत त्यांना ऑनलाइन अर्ज भरण्याची संपूर्ण प्रक्रिया, आवश्यक कागदपत्रांची पूर्तता, कागदपत्रे अपलोड करण्याची पद्धत तसेच अर्जाची पडताळणी याबाबत सविस्तर मार्गदर्शन करण्यात आले. त्यांचा ऑनलाइन क्लेम इंटरेस्ट अर्ज यशस्वीरित्या पूर्ण करण्यात आला.
याप्रसंगी अमृतचे हिंगोली जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत धोतरे यांनी सांगितले की, अमृतच्या माध्यमातून वैयक्तिक कर्जाचा लाभ घेतलेल्या सर्व पात्र लाभार्थ्यांनी शासनाच्या नियमानुसार ऑनलाइन क्लेम इंटरेस्ट अर्ज वेळेत सादर करावा. अर्ज भरताना आवश्यक कागदपत्रे अचूक स्वरूपात सादर केल्यास अर्ज निकाली काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होते.
तसेच, ऑनलाइन अर्ज भरण्यात कोणतीही अडचण येत असल्यास लाभार्थ्यांनी अमृत जिल्हा कार्यालय, हिंगोली येथे प्रत्यक्ष भेट देऊन आवश्यक मार्गदर्शन घ्यावे. जिल्हा कार्यालयामार्फत सर्व पात्र लाभार्थ्यांना अर्ज प्रक्रियेसाठी आवश्यक सहकार्य उपलब्ध करून दिले जात असून, कोणताही पात्र लाभार्थी या योजनेपासून वंचित राहू नये, यासाठी विशेष प्रयत्न करण्यात येत आहेत.
हिंगोली जिल्ह्यातील सर्व पात्र लाभार्थ्यांनी अंतिम मुदतीपूर्वी ऑनलाइन क्लेम इंटरेस्ट अर्ज सादर करून अमृतच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहनही जिल्हा व्यवस्थापक श्रीकांत धोतरे यांनी केले.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment