फॅब्रिकेशन व्यवसाय क्षेत्रात कार्यरत असलेले श्री. गोपाळ झंवर यांनी अमृत कार्यालय, लातूर येथे सदिच्छा भेट देऊन अमृतमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी विशेषतः कर्ज व्याज परतावा योजनेबाबत माहिती घेतली.
लातूर : फॅब्रिकेशन व्यवसाय क्षेत्रात कार्यरत असलेले श्री. गोपाळ झंवर यांनी अमृत कार्यालय, लातूर येथे सदिच्छा भेट देऊन अमृतमार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना व उपक्रमांची सविस्तर माहिती जाणून घेतली. यावेळी त्यांनी विशेषतः कर्ज व्याज परतावा योजनेबाबत माहिती घेतली.
अमृत कार्यालयातील अधिकारी व कर्मचाऱ्यांनी श्री. झंवर यांना संबंधित योजनांची पात्रता, आवश्यक कागदपत्रे, अर्ज प्रक्रिया तसेच योजनांच्या माध्यमातून उपलब्ध होणाऱ्या विविध लाभांबाबत मार्गदर्शन केले. यावेळी श्री. झंवर यांनी अमृतच्या योजनांची माहिती घेतल्यानंतर आपल्या समाजातील तसेच लक्षित गटातील अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांपर्यंत योजनांची माहिती पोहोचवून त्यांचा प्रचार-प्रसार करण्यासाठी सहकार्य करण्याची ग्वाही दिली.
शासनाच्या विविध योजनांचा लाभ पात्र लाभार्थ्यांपर्यंत पोहोचविण्यासाठी योजनांची योग्य माहिती व जनजागृती महत्त्वाची असून, त्यासाठी समाजातील विविध घटकांनी पुढाकार घेणे आवश्यक आहे, असे मत यावेळी व्यक्त करण्यात आले. तसेच भविष्यात आवश्यकतेनुसार अमृत कार्यालयाकडून मार्गदर्शन व सहकार्य मिळेल, अशी अपेक्षाही श्री. झंवर यांनी व्यक्त केली.
अमृत कार्यालय, लातूर यांच्या माध्यमातून पात्र लाभार्थ्यांना विविध शासकीय योजना, रोजगार, स्वयंरोजगार, शैक्षणिक व आर्थिक सहाय्याच्या योजनांची माहिती व मार्गदर्शन उपलब्ध करून देण्यात येत असून, अधिकाधिक पात्र लाभार्थ्यांनी कार्यालयाशी संपर्क साधून योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ :https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment