‘अमृत-सक्षम’ (AMRUT-SAKSHAM) या हरित उद्योजकता आणि कचरा व्यवस्थापन आधारित उपक्रमाच्या अनुषंगाने गेवराई नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विक्रम मांडुरके यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी अमृतचे बीड जिल्हा व्यवस्थापक विशाल जोशी व अमृत मित्र सुमित धिरडे उपस्थित होते.
गेवराई (प्रतिनिधी): महाराष्ट्र शासनाच्या स्वायत्त संस्थेमार्फत राबविण्यात येत असलेल्या ‘अमृत-सक्षम’ (AMRUT-SAKSHAM) या हरित उद्योजकता आणि कचरा व्यवस्थापन आधारित उपक्रमाच्या अनुषंगाने गेवराई नगरपरिषदेचे मुख्याधिकारी विक्रम मांडुरके यांची सदिच्छा भेट घेण्यात आली. यावेळी अमृतचे बीड जिल्हा व्यवस्थापक विशाल जोशी व अमृत मित्र सुमित धिरडे उपस्थित होते. भेटीदरम्यान ‘अमृत-सक्षम’ उपक्रमाची संकल्पना, उद्दिष्टे तसेच कचऱ्यापासून उद्योग व रोजगारनिर्मितीच्या विविध संधींबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. फुलांचा कचरा, नारळाच्या करवंट्या, बागेतील जैविक कचरा, ई-वेस्ट तसेच रिसोर्स रिकव्हरी सेंटर (RRR) यांच्या माध्यमातून स्थानिक स्तरावर उद्योग उभारणी करून रोजगाराच्या संधी निर्माण करता येऊ शकतात, याविषयी माहिती देण्यात आली. तसेच गेवराई शहरातील युवक-युवती, महिला बचत गट, नवउद्योजक आणि स्वयंसेवी संस्थांना या उपक्रमाशी जोडून त्यांना प्रशिक्षण, मार्गदर्शन व उद्योग उभारणीसाठी आवश्यक सहाय्य उपलब्ध करून देण्याबाबतही चर्चा झाली. कचरा व्यवस्थापनाला आर्थिक मूल्य प्राप्त करून देत पर्यावरण संरक्षणासोबतच स्वावलंबी उद्योजक घडविण्याचे उद्दिष्ट ‘अमृत-सक्षम’च्या माध्यमातून साध्य होणार असल्याचे विशाल जोशी यांनी सांगितले. यावेळी मुख्याधिकारी विक्रम मांडुरके यांनी उपक्रमाचे कौतुक करत हा उपक्रम स्वच्छता, पर्यावरण संवर्धन आणि रोजगारनिर्मिती या तिन्ही दृष्टीने महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे मत व्यक्त केले. तसेच नगरपरिषदेच्या कार्यक्षेत्रात या उपक्रमाच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले. या सकारात्मक चर्चेमुळे गेवराई शहरात हरित उद्योजकता, कचरा व्यवस्थापन आणि स्थानिक रोजगारनिर्मितीला चालना मिळण्यास मदत होणार असल्याचा विश्वास व्यक्त करण्यात आला. तसेच आगामी काळात नगरपरिषद आणि ‘अमृत’ यांच्या समन्वयातून विविध उपक्रम राबविण्याबाबतही सकारात्मक चर्चा झाली. अधिक माहितीसाठी संपर्क : 73910 65468
पत्ता : अमृत संस्थेचे बीड जिल्हा कार्यालय, अथर्व अभ्यासिकेच्या वर, नवगण कॉलेज रोड, वाघ नेत्रालयाशेजारी, बीड. 431122 अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कोमटी, मारवाडी, गुजराती, सिंधी, कायस्थ, जाट, बणिया, बंत्स, नायर अय्यंगार, पाटीदार, बंगाली, पटेल, येलमार, त्यागी, सेनगुनथर, राजपुरोहित, नायडू, एलमार इत्यादींचा समावेश आहे. अशा जातींमधल्या वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. अधिक माहितीसाठी आपापल्या जिल्ह्यातील ‘अमृत’ कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, ‘अमृत’चे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
संकेतस्थळ : https://mahaamrut.org.in/
Comments 0 Comments
No comments yet
You can start the discussion
Write a Comment